चेकपोस्टवरील शुल्कास आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

औरंगाबाद - राज्याच्या सीमेवर 22 चेकपोस्ट आहेत. या चेकपोस्टवर वाहनधारकांकडून सेवाशुल्कच्या नावाने चुकीच्या पद्धतीने शुल्क आकारणी केली जात असल्याचा आक्षेप घेऊन, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली आहे.

बुधवारी (ता. 21) या याचिकेवर सुनावणी झाली असता, याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करण्यात आला. आता याचिकेवर शुक्रवारी (ता. 23) सुनावणी होईल. महाराष्ट्रात येण्यासाठी अथवा बाहेर जाताना हद्दीवर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा अशा विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या हद्दीत 22 चेकपोस्ट आहेत.

Web Title: aurangabad marathwada news check post fee court