मालमत्तेची माहिती लपविणाऱ्या एमआयएम नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - एमआयएमचे नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. आठ) सिटी चौक ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. उमेदवारीकरिता नामनिर्देशनपत्र भरताना सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेची माहिती त्यांनी लपविल्याचा आरोप आहे.

फसवणूक प्रकरणात वाहेदअली झाकेर अली हास्मी (रा. शाहीनबाग, दिलरस कॉलनी) यांनी तक्रार दिली. एमआयएमचे नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांनी २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वॉर्ड क्रमांक १९ (आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी) या प्रभागातून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्या वेळी नामानिर्देशनपत्र भरताना त्यासोबत त्यांनी शपथपत्र सादर केले होते. यात त्यांच्या नावे औरंगाबाद महापालिका हद्दीत भूमापन (क्र. ११२५५/१) येथील मकसूद कॉलनीत १३.९४ चौरस मीटरचा भूखंड असतानाही त्यांनी माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली. बनावट व खोटे शपथपत्र तयार करून वाहेदअली झाकेरअली हास्मी व मतदारांची फसवणूक केली व गैरकायदेशीररीत्या नगरसेवकपद मिळविले, असे वाहेदअली झाकेरअली हास्मी यांनी तक्रारीत नमूद केले. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार हरीश खटावकर करीत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news crime on mim corporator