जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे झडतीसत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पोलिसांनी शोधले रेकॉर्ड; आमदार भुमरेंची आयुक्तालयात हजेरी

औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. २२) दोन तास झडतीसत्र राबविले. तीन बिगरशेती संस्थांचे रेकॉर्ड शोधण्यासाठी पोलिसांनी ही झाडाझडती घेतली; पण त्यांच्या हाती विशेष काही लागले नाही; मात्र बिगरशेती कर्ज विभागाचे प्रमुख वैद्य यांचा जबाब पोलिसांनी घेतला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने बिगरशेतकरी संस्थांना अवैध कर्जमाफी दिल्याप्रकरणी अध्यक्ष, संचालकांसह एकूण २८ जणांविरुद्ध आठ जूनला गुन्ह्याची नोंद झाली. गुन्हा नोंद झालेल्यांत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, नितीन पाटील, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांच्यासह बॅंकेच्या एकूण २८ जणांचा समावेश आहे.

पोलिसांनी या प्रकरणी सर्व संचालकांचे जबाब घेतले. यात कार्यकारी संचालक राजेश्‍वर कल्याणकर यांचा चार दिवसांपासून सुरू असलेला जबाब गुरुवारी पूर्ण झाला. तत्पूर्वी आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने बॅंकेत झाडाझडती घेतली. कर्जमाफी केलेल्या बावन्न संस्थांपैकी ४९ संस्थांचे दस्ताऐवज पोलिसांकडे आहेत; परंतु तीन संस्थांचे रेकॉर्ड पोलिसांकडे नव्हते. त्यासाठी ही झडती मोहीम राबविण्यात आली; पण तेथे या संस्थेचे रेकॉर्ड सापडले नाहीत. पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे, विलास कुलकर्णी, दत्तू गायकवाड, फेपाळे यांनी झडतीसत्र राबविले.

आमदार भुमरे पुन्हा आयुक्तालयात
आमदार संदीपान भुमरे यांचा जबाब झाल्यानंतर त्यांना व अन्य काही संचालकांना २२ जूनला पोलिस आयुक्तालयात येण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार, भुमरे यांनी आयुक्तालयात हजेरी लावली. त्यांची विचारपूस करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Web Title: aurangabad marathwada news district central bank cheaking