भीमराया, घ्या तुम्ही लेकरांची वंदना!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

औरंगाबाद - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. विविध पक्ष, संघटना, तसेच शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. 

औरंगाबाद - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. विविध पक्ष, संघटना, तसेच शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. 

क्रांती कामगार व कर्मचारी युनियन
युनियनतर्फे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव भोळे यांच्या हस्ते भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अध्यक्ष सुधाकर चांदणे, संजय खरात, विजय रिडलॉन, सुनील बावस्कर, शंकर चांदणे, भास्कर मगर, गणेश चांदणे, गौतम हिवराळे, पंकज देहाडे, अनिल बनकर, जीवन भिवसने, भाऊसाहेब खरात, सुदाम दुरगुडे, रमेश गोदे, प्रकाश जाधव, अनिल वाघुले, सुनील खैरनार, विनायक साठे यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद शहर काँग्रेस समिती 
आंबेडकरनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला चक्रधर मगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अर्चना मुंदडा, शशिकला मगरे, अनसूया दणके, ललिता साळवे, चंद्रकलाबाई साळवे, पद्माबाई साळवे, इंदूबाई साळवे, नाना साळवे, राहीबाई साळवे, नागेश साळवे, सुमित मगरे, संजय साठे, यादव आहिरे यांची उपस्थिती होती.

लियो संघटना 
लोकशाही इंडिपेंडंट यंग ऑर्गनायझेशन (लियो) संघटनेतर्फे भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. संस्थापक अध्यक्ष रवींद्र साळवे, विन्सेंन्ट दिवे, दत्तात्रय अभंग, राजकुमार डावरगावे, विनायक कोठारे, नितीन मोकळे, विशाल नांदरकर, अफसर बेग, संजय वडोदे, समाधान तायडे, सागर सोनवणे, श्रीकांत पुरी, आकाश घुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

रेणूका हायस्कूल 
शाळेत पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी १४० पुस्तकांचे संकलन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. मुख्याध्यापिका एम. एन. वाघुले यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला व्ही. जी. पाटील, एस. ए. गव्हाणे, एम. व्ही. हराळे, सी. एन. शेरकर, एस. आर. तायडे, एस. एस. नागलबोने, बी. ए. शिंदे, वाय. डी. त्रिभुवन यांची उपस्थिती होती.

तुकाराम सोनवणे हायस्कूल व संत तुकाराम विद्यालय
भदंत महेंद्रबोधी व शीलबोधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, सचिव संगीता खिल्लारे, मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी एस. टी. चौधरी, एस. यू. चौधरी, नाझिमा खान, विजय पाटील, एस. आर. शिंदे, सुषमा भवरे, विद्या पारखे, कमल खरात, श्‍याम नाडे यांनी पुढाकार घेतला. सुमित सुरडकर यांनी सूत्रसंचालन केले. पूजा मगरे यांनी आभार मानले. 

एमआयटी हायस्कूल
अध्यक्षस्थानी संजय वानखेडे होते. बाळासाहेब पायाळ यांनी विचार व्यक्त केले. वैष्णवी पवार यांनी सूत्रसंचालन केले. रूपाली यादव या विद्यार्थिनीने आभार मानले. कार्यक्रमासाठी अरुणा कवडे, रंजना पाटील, वर्षा चतुर, राजेंद्र ढमाले, प्रदीप वाडे, लता मंदे, गजानन जाधव यांनी पुढाकार घेतला.

श्री बालाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. व्ही. हंकारे होते. संस्कृतिक विभागप्रमुख एस. व्ही. ढगे, प्रकाश गजहंस यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विद्यार्थ्यांनी भाषणातून बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला. एस. के. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एन. व्ही. पवार यांनी आभार मानले.

युवाक्रांती संघटना
बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश शिंदे, भाऊसाहेब गारुळे, बापू सोनवणे, शिवाजी भगुरे, प्रमोद मगरे, प्रदीप पगारे, शरद म्हस्के, सुधाकर चांदणे, रूपेश कांबळे, अभिजित साळवे, राहुल बोबडे, मुनीराज नरवडे, अमोल जामुंदे उपस्थित होते.

कमल मानव कल्पान संघटना 
कमल मानव कल्पान संघटनेतर्फे भटकलगेट येथील डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भूषण धनेगावकर, पूजा, डोंगरे, डॉ. रमेश धनेगावकर उपस्थित होते.

भारतीय जनसंघर्ष सेना
भडकल गेट येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुशील भिसे, सुनील बोराडे, अनिल धुपे, रवी गवई, अनिल दांडगे, दीपक भोळे, प्रकाश बोराडे, संजय झिने, रवींद्र वैष्णव, सखाराम गायकवाड, संजय धनराज आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सुनील बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.

पीपल्स रिपब्लिकन पक्ष
भडकल गेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. या वेळी ॲड. जे. के. नारायणे, सागर कुलकर्णी, अशोक जाधव, रामदास लोखंडे, रविनाथ भजन, सुनील खरात, भाऊसाहेब तायडे, बाबासाहेब तायडे, राहुल पडघन, शेषराव सातपुते, प्रमोद शिरसाठ, राजू त्रिभुवन, विजय खरात, नितीन आदमाने, लक्ष्मण कांबळे, अजय मोकळे, शारदा गायकवाड, ललिता मगरे, मीनाक्षी शिरसाठ, उषा साठे, लीला बनसोडे, नंदा गायकवाड, मंगल सोनवणे, रेखा राजभोज, छाया तायडे, राजेश्री जाधव यांची उपस्थिती होती.

स्वामी समर्थ प्राथमिक शाळा
मुख्याध्यापक जी. यू. दग्रसकर, आर. आर. अवचार, सी. बी. वाघ, एस. टी. भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. पी. ए. पवार यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी विचार व्यक्त केले. डी. बी. जगताप यांनी आभार मानले. 

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष
सुनील वाकेकर, महादुजी पगारे, अरविंद कांबळे, राजू हिवाळे, रमेश पाटील, देव राजळे, अनामी मोरे, समाधान मगर, सुनील सदावर्ते, सुनील वंजारे, विनय वाघमारे, अविनाश राऊत, राजू निकम, आर्यन वाघमारे, नयन ठोके, अविनाश राऊत यांची उपस्थिती होती. 

भारतीय बहुजन आघाडी
भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी मराठवाडा अध्यक्ष पंडितराव गाढे, श्री. भालेराव, नागेश मोटे, बबन जाधव, दिवाकर बोरगे, मधुकर वाघमारे, भाऊसाहेब चंदनशिव, सूरज मोटे, नामदेव तुपसमुद्रे, नामदेव कांबळे, विजय गवळी, संदीप तुपे, अंकुश घुले, रंगनाथ खुडे, आद्रेश बोरगे, पंकज बोरगे, सूरज भालेराव, आकाश शेजवळ उपस्थित होते. 

ज्ञानसंदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मिसारवाडी
संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, मुख्याध्यापक अभिजित सोनवणे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यांनतर कॅंडल रॅली काढण्यात आली. अंजली गायकवाड, समरीन शेख, जेबा पठाण यांनी गीतगायन केले. प्रिया तुलसे, हुरजान पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. वैशाली बागूल यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली. आनंद सातदिवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी वैशाली बोरुडे, स्वामी जाधव, किरण सोनवणे, गौतम मकासरे, अजय खिल्लारे, विजय आघाव, नय्युम शेख यांनी पुढाकार घेतला.

स्वयंभू प्राथमिक विद्यालय, चिकलठाणा
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विलास देव होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी. आर. वाकलकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोमनाथ वाघ यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. पी. देडे यांनी आभार मानले. 

जय भवानी विद्यामंदिर, जय विश्‍वभारती कॉलनी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दत्तात्रय पवार होते. शोभा कासलीवाल, कल्पना चव्हाण, रजनी भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. महेश तळेकर, अबोली बनकर, उन्नती कासलीवाल या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. आनंद कदम यांनी सूत्रसंचालन केले. संगीता शिंदे यांनी आभार मानले.

ज्ञानज्योत स्कूल, मुकुंदवाडी
मुख्याध्यापिका अनिता शिंदे, विद्या हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर भाषणातून प्रकाश टाकला. अर्चना पोकळे यांनी केले सूत्रसंचालन केले. बंडू चव्हाण यांनी आभार मानले. 

जिजामाता कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गुलमोहर कॉलनी
रमेश हरणे, मुख्याध्यापिका परिमला बिदरकर, शशिकला जाधव, श्‍यामा अपराजित, संध्या झोपे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्या जोशी यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. रंजना हरणे यांनी सूत्रसंचालन केले. अंकिता जगधने यांनी आभार मानले. 

नालंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकुंदवाडी
अध्यक्षस्थानी एस. एच. आडे होते. आर. बी. घायतिलक यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. करण भदरगे, अंजली पांचाळ, अस्मिता पवार, मयूरी खरात यांनी मनोगत व्यक्त केले. डी. ई. धवन, के. एम. वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पूजा पठारे हिने सूत्रसंचालन केले. आभार सुनीता गायकवाड यांनी मानले. 

मुकुल मंदिर माध्यमिक विभाग, सिडको
बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. झाशी डोंगरे, अफरोज शेख यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. प्रचिती हसेगावकर यांनी गीतगायन केले. या प्रसंगी ऋतुजा गाडेकर आणि आमृता पडवळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका जोशी यांनी आभार मानले.

जगदंबा प्राथमिक शाळा, गारखेडा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. ई. वर्पे होते. या वेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. एम. जी. वाघ यांनी गीतगायन केले. बी. के. कवडे यांनी मार्गदर्शन केले. विनोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. के. कवडे यांनी आभार  मानले. 

सातारा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा 
मुख्याध्यापिका मंजुश्री राजगुरू, संजीवनी पांचाळ, शिल्पा नवगिरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले; तसेच होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, श्रुतलेखन स्पर्धा घेण्यात आली. 

विनायकराव पाटील प्राथमिक शाळा, सिडको
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहलता हिवर्डे होत्या. वर्षा साहुजी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अंजली कदम, श्रद्धा जाधव या विद्यार्थिनींनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. सुनील मगर यांनी मनोगत व्यक्त केले. हर्षदा आघाडे यांनी सूत्रसंचालन केले. इफ्रा मेहर इनामदार हिने आभार मानले. 

शंभुराजे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सातारा परिसर
माध्यमिकच्या मुख्याध्यापिका वैशाली मोरे व प्राथमिकचे श्रीकांत मुळीक यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आरती वाघ, शिवम बोंगाणे यांनी भाषणे केली. या प्रसंगी कापडी पिशव्या बनविण्याच्या कार्यशाळा स्पर्धेतील विजेत्या अमृता शहाणे, खेतेश्री गायकवाड यांना बक्षिसे देण्यात आली. ऋत्त्विक गायकवाड, हर्षद फाटे, जयेश सोनवणे यांनी भाषणे केली. आर्यन बेदरकर आणि एस. पी. गोरे यांनी सूत्रसंचालन केले. यू. बी. रेड्डी, सचिन नरवडे यांनी आभार मानले. 

पी. यू. जैन प्राथमिक विद्यालय, शहागंज
शाळेत भित्तिपत्रक बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. श्वेता काला, श्रुती पहाडे, प्रियांका चुडीवाल यांनी परीक्षण केले. या वेळी मुख्याध्यापिका कविता ठोळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. इयत्ता चौथी व पाचवीतील विद्यार्थ्यांनी पोवाडा व गीतगायन केले. सुनंदा अन्नदाते यांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती दिली. रेखा काला यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना अजमेरा यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नीलेश अजमेरा, नंदकुमार साळकर, अजय पहाडे, त्रिशला वायकोस यांनी पुढाकार घेतला.

शिवछत्रपती विद्यालय, औरंगाबाद 
प्राचार्य अशोकराव मुखेकर, वंदना मुखेकर, गजानन पवार, घनश्‍याम दहिहंडे, गजानन मंझा, संतोष गोराडे, महेश घोरतळे, श्रीमती जोशी, श्रीमती देवकर, श्रीमती राठोड यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. 

गजानन बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय, गारखेडा
अध्यक्षस्थानी राजेंद्र जैस्वाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता जैस्वाल, अश्‍विनी जैस्वाल, पूर्वा बेथारिया, पी. एम. गौकांडे उपस्थित होते. या प्रसंगी क्रीडा सप्ताहाचे बक्षीस वितरण करण्यात आले. माधुरी मोरे, सुभद्रा तांबे, सम्यक जोंधळे, मयूरी जाधव, संदेश देहाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी चेतना तुरे, ज्योती ठोंबरे, भागवत शिंदे, संतोष किवंडे यांनी पुढाकार घेतला. पी. के. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डी. एच. चव्हाण यांनी आभार मानले.

फुले समता परिषद
महाराष्ट्र राज्य जनजागरण व संघर्ष समिती, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बाबा दळवी विचार मंच, देवगिरी साहित्य कला अकादमी व विविध संस्था आणि संघटनांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेविका कीर्ती शिंदे, अनिता देवतकर, संजीवनी घोडके, मंजूषा महाजन, संदीप घोडके, सोमनाथ चोपडे, एन. एस. कांबळे, रमेश गायकवाड, विलास ढंगारे आदी उपस्थित होते.

भारतीय दलित कोब्रा
भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक बोर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी बाबासाहेब आस्वार, विजय प्रधान, राजेंद्र दाभाडे, आनंद बोर्डे, रोहित बोर्डे, भीमराव सावते, जानू राठोड, तुळशीराम सुरे, सुमित्रा खंडारे, आशाबाई मासुळे उपस्थित होते.

राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, गारखेडा 
मुख्याध्यापक जे. आर. अंभोरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ता म्हणून वंदना चव्हाण यांची यांची उपस्थिती होती. या वेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, श्रीमती चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती दिली. 

पॅंथर सेना
भडकल गेट येथे पॅंथर सेनेच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संघटनेचे जिल्हा सचिव विशाल नवगिरे, अशरफ शेख, दीपक डांगरे, राष्ट्रपाल गवई, अविनाश मगरे, खुशाल गायकवाड, अक्षय भोळे, सुमित साबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रमणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संजयनगर मुकुंदवाडी 
संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार दाभाडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष आसाराम शिनगारे, सचिन गायकवाड, सहसचिव संजय कांबळे, कोषाध्यक्ष रमेश दांडगे, सुदेश भालेराव, कैलास शिंदे, गणेश खरात, राजू दाभाडे, जगन्नाथ शिनगारे, लक्ष्मण कांबळे, राहुल दांडगे, गौरव शिंदे आदींची उपस्थिती होती.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकल गेट येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दौलत खरात, जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, शहराध्यक्ष विजय मगरे, सिद्धार्थ दाभाडे, विलास सौदागर, पुंजाराम जाधव, सुमित भटकर, प्रवीण कांबळे, नितीन दाभाडे, सूरज पाखरे, रमेश चांदणे, अशोक निकम, शैलेश झाल्टे, राजहंस कांबळे, भागचंद प्रधान, विनोद सोनवणे, अजय साळवे, भाऊसाहेब साळवे, विनोद सोनवणे, ताराचंद साळवे, आत्माराम चव्हाण, प्रमोद बोर्डे, संजय मुकुटमल, किशोर पगारे, सहदेव सदावर्ते, गौतम धांडाळ, राजू सुरडकर यांची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad marathwada news dr. babasaheb ambedkar mahaparinirvan din