पीएफ काढायचाय? फक्त क्‍लिक करा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

औरंगाबाद - भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने आता पीएफ काढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे कामगारांना ऑनलाइन पद्धतीने पीएफमधील क्‍लेम करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे केवळ 15 दिवसांच्या आत पीएफची रक्कम खात्यात जमा होणार आहे.

औरंगाबाद - भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने आता पीएफ काढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे कामगारांना ऑनलाइन पद्धतीने पीएफमधील क्‍लेम करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे केवळ 15 दिवसांच्या आत पीएफची रक्कम खात्यात जमा होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12 टक्के ईपीएफ कापून घेतला जातो. तितकीच रक्कम कंपनी आपल्या खात्यात जमा करते. जमा झालेली रक्कम दरमहा संबंधित कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात जमा होते. या रकमेवर दरवर्षी व्याजही चांगले मिळते. नोकरदार मंडळी त्यांच्या गरजेनुसार निवृत्तीपूर्वीदेखील पीएफ खात्यातील पैसे काढू शकतात. पण पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आल्याने विभागातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

त्यानुसार कर्मचारी घरबसल्याही पीएफमधील रक्कम काढण्यासाठी क्‍लेम करू शकणार आहे. पूर्वी पीएफ काढण्याच्या किचकट पद्धतीमुळे वारंवार नागरिकांना पीएफ ऑफिसच्या चकरा मारव्या लागत होत्या. ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पीएफ विभागाने ऑनलाइन क्‍लेम सुविधा सुरू केली. सोबतच कर्मचाऱ्याच्या खात्यात 15 दिवसांमध्ये पैसे जमा होतील.

अशी काढा पीएफ रक्‍कम
कर्मचाऱ्याने पीएफ काढण्यासाठी प्रथम ईपीएफओच्या वेबसाईटवर क्‍लिक करावे. त्यानंतर अर्ज ऍडव्हान्स पीएफ काढण्यासाठी फॉर्म नंबर 31, तर निवृत्तीनंतर- 19 "10 सी'चा अर्ज उपलब्ध होईल. कर्मचाऱ्याने आपल्या गरजेनुसार योग्य क्रमांकाचा अर्ज भरावा. ऑनलाइन ऍप्लिकेशनसाठी तुम्ही ऍपचाही वापर करू शकता, अशी माहिती पीएफ ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: aurangabad marathwada news Easy to get rid of provident fund

टॅग्स