मालमत्ता कर, पाणीपट्टीने मोडलेय शिक्षण संस्थाचालकांचे कंबरडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

औरंगाबाद - शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष, उदासीन धोरणामुळे शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत असून रोज उगवणारा दिवस शिक्षण क्षेत्रात नवीन समस्या घेऊन येत आहे. सर्वांना आता नवीन जीआर कोणता येईल याची धास्तीच असते. एकीकडे अनेक शाळा विनाअनुदानित असताना महापालिकेकडून त्यांना मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, संस्थाकराच्या अनेक अडचणींनी संकटे वाढविल्याच्या तीव्र प्रतिक्रिया संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांनी व्यक्त केल्या. ‘सकाळ’तर्फे गुरुवारी (ता.

औरंगाबाद - शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष, उदासीन धोरणामुळे शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत असून रोज उगवणारा दिवस शिक्षण क्षेत्रात नवीन समस्या घेऊन येत आहे. सर्वांना आता नवीन जीआर कोणता येईल याची धास्तीच असते. एकीकडे अनेक शाळा विनाअनुदानित असताना महापालिकेकडून त्यांना मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, संस्थाकराच्या अनेक अडचणींनी संकटे वाढविल्याच्या तीव्र प्रतिक्रिया संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांनी व्यक्त केल्या. ‘सकाळ’तर्फे गुरुवारी (ता. २९) आयोजित बैठकीत संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, अडचणी, शासन-प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षावर आपली परखड मते व्यक्त केली. 

संचमान्यतेत अनेक घोळ झालेले आहेत. यामध्ये संस्थाचालकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. एखाद्या संस्थेने दहा-बारा वर्षे संस्था चालविल्यानंतरही शिक्षकांची भरती करता येत नाही, इमारतीचे भाडेही मिळत नाही. शाळा हे विद्येचे मंदिर असताना त्यांना मालमत्ता कर, पाणीपट्टी, संस्थाकर लावून अडचणीत आणले जात आहे. शाळा विद्येचे मंदिर असल्याने हा कर माफ व्हायला हवा. सन २००४ पासून कोणत्याही शाळेला इमारत भाडे मिळाले नाही. त्यातच कर लावला जात असल्याने संस्थाचालकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विनाअनुदानित शिक्षक १०० टक्के अनुदानास पात्र असतानाही त्याची २० टक्के अनुदानावर बोळवण करण्यात आली आहे. शाळा डिजिटल करण्याचे सांगितले जात असले तरी त्याचा खर्च कुणी द्यायचा हासुद्धा प्रश्‍न आहे, अशी अनेक मते उपस्थित संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांनी मांडली. 

यावेळी मिलिंद पाटील, एस. पी. जवळकर (ज्ञानप्रकाश विद्यामंदिर), गोविंद गोंडे पाटील (अध्यक्ष, औरंगाबाद संस्थाचालक संघ), मनोज पाटील, वाल्मीक सुरासे, कविता मुंडे, डॉ. रश्‍मी बोरीकर, उज्ज्वला निकाळजे (शारदा कन्या प्रशाला शाळा), मिर्झा सलीम बेग (अध्यक्ष, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ), डॉ. सतीश सुराणा (विजयेंद्र काबरा महाविद्यालय), इल्हाजोद्दीन फारुकी, वहीद सिद्दिकी, पी. एम. शिंदे (एस. पी. एम. माध्यमिक विद्यालय, फुलंब्री), आनंद खरात (ज्ञानसागर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), रामनाथ पंडुरे (ज्ञानेश विद्या मंदिर, सिडको, एन-२), प्रकाश दाणे (जि. प. प्रा. शाळा, घारदोन), जी. टी. पदार (महारुद्र विद्यालय, कुंभेफळ), डॉ. के. टी. हाके (श्रीमती वेणूताई प्रा. शाळा, एन-४), एस. के. चव्हाण (दादोजी कोंडदेव मा. विद्यालय, मयूरपार्क), पाटोदी विजय एस. (पी. यू. जैन मा. विद्यालय, राजाबाजार), जयंत चौधरी व सुरेश परदेशी (मुकुल मंदिर शाळा, सिडको एन-सात), राकेश गांगुर्डे (गणपतराव जगताप विद्यामंदिर, मुकुंदवाडी), संदीप सोनवणे (तुकाराम सोनवणे हायस्कूल, आंबेडकरनगर), अभिजित सोनवणे (ज्ञानसंदीप हायस्कूल, मिसारवाडी), प्रकाश सोनवणे (संत तुकाराम हायस्कूल, आंबेडकरनगर), महेंद्र बारवाल व विजय ढाकरे (जि. प. प्रा. शाळा, धोपटेश्‍वर), बी. डब्लू. झोडपे (मराठा हायस्कूल, चौराहा), म्हस्के भारत (नूतन बहुउद्देशीय प्रा. विद्यालय, हडको), संजय सावजी (ओमकार विद्यालय, वंजारवाडी), मीनाक्षी गोसावी (माँटेसोरी बालक मंदिर शाळा, औरंगपुरा), प्रांजली सावजी व नाईकवाडे मॅडम (वंडर गार्टन शाळा, गारखेडा), मयूरा पटेल (गुजराती कन्या विद्यालय, गोकुळनाथ मोहल्ला), जे. बी. खोत (बालविकास विद्यामंदिर, पवननगर, एन-९), खान मोहंमद यासेर (मुख्याध्यापक, मोहसीन अहमद उर्दू शाळा), व्ही. डब्ल्यू. विल्सन (आदर्श इंग्लिश स्कूल, फुलंब्री व करमाड), एस. पी. थोटे (शिवाजी हायस्कूल, खोकडपुरा), नमिता राठी, रंजना मिरकर (आदर्श इंग्लिश स्कूल, हिवरा फाटा, करमाड), एस. यू. वाघ, सी. आर. पोरवाल (जागृती प्रायमरी स्कूल, बन्सीलालनगर), यू. के. नाईक (शिशुविहार हायस्कूल, औरंगपुरा), डॉ. सुशील बोर्डे (महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय, खोकडपुरा), राजेंद्र वाणी (महाराष्ट्र राज्य शिक्षक, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती संस्था अध्यक्ष प्रतिनिधी) यांची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad marathwada news education organisation load by property tax & water tax