महावितरणचे वराती मागून घोडे

प्रकाश बनकर
रविवार, 16 जुलै 2017

सात वर्षांपूर्वीच केले होते अलर्ट

औरंगाबाद - वीज मीटरला हात न लावता रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने रीडिंग बंद करणारे रॅकटे उघड झाल्याने महावितरण प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, जून २०१० मध्ये महावितरणच्या दक्षता विभागाने नाशिक येथे रिमोटद्वारे चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करीत औरंगाबादेतही असे प्रकार सुरू असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून कुठलीच कारवाई झाली नाही. सात वर्षांनंतर जागे झालेल्या महावितरणचे ‘वराती मागून घोडे’ निघाल्याची चर्चा सुरू आहे.

औरंगाबाद शहरातही २०१० पूर्वीपासून मोठ्या प्रमाणावर रिमोटद्वारे वीजचोरी करण्यात येत असल्याची माहिती, नाशिक येथील कारवाईनंतर महावितरणचे दक्षता व सुरक्षा पथकाचे उपसंचालक सुमितकुमार, मुख्य अभियंता श्रीहरी चौधरी आणि अधीक्षक अभियंता दत्तात्रेय टेल्लारकर यांनी दिली होती. त्यांच्या कारवाईत अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळले होते. यात मीटरमध्ये लूप किंवा सेन्सॉर बसवून वीजचोरी करण्यात येत होती. सिंगल फेज ते बड्या उद्योजकांपर्यंत वीजचोरी करीत असल्याचीही बाब त्या वेळी समोर आली होती. या कारवाईत गुजरातच्या जामनगर येथील जितेंदर जिंदलानी हा रॅकेटचा म्होरक्‍या पकडला होता. त्याने या मीटरच्या सॉफ्टवेअरचा बारकाईने अभ्यास करीत रिमोट कंट्रोल तयार केला. नाशिकसह औरंगाबाद, पुणे, मुंबई शहरांत याची विक्री केली असल्याचीही बाब उघड झाली. याच प्रकारे शहरात चायनामेड रिमोट आले. दक्षता, सुरक्षा विभागाने राज्यभर सूचना दिली होती; मात्र याची कोणीच दखल घेतली नाही. याविषयी कोणी दिरंगाई केली हे शोधून महावितरण त्यांच्यावर कारवाई करणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागूल राहिले आहे.

Web Title: aurangabad marathwada news electricity issue