इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑटोमोबाइलच्या किमती वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

जीएसटीमुळे तीन ते पाच टक्‍के वाढीची शक्‍यता; किराणा वस्तू, सोने-चांदीच्या मजुरीत वाढ

औरंगाबाद - देशात एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. या नव्या करप्रणालीमुळे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंसह किराणा, सोने-चांदीच्या तयार वस्तू, ऑटोमोबाइल वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. ‘एक देश-एक कर’ या वस्तू आणि सेवा कराच्या तत्त्वानुसार करप्रणालीचा अवलंब करताना व्यापाऱ्यांसह ग्राहकांना मोठी झळ बसणार आहे. सर्वच क्षेत्रांत जवळपास पाच टक्‍क्‍यांपर्यंत किमतीत वाढ होण्याची शक्‍यता तज्ज्ञांतर्फे वर्तविण्यात येत आहे.

शहरातील व्यापार, उद्योगांमध्येही जीएसटीची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे या नव्या करप्रणालीमुळे बाजारात कोणत्या वस्तूच्या किमती वाढतील याचे अंदाज बांधण्यात येत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुचाकी, चारचाकी वाहनांच्या किमतीमध्ये तीन ते पाच टक्‍के वाढ होणार आहे; तर सोने, चांदीच्या वस्तूंच्या मजुरीत पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होणार असून, ८० टक्‍के टॅक्‍स वाढणार आहे. किराणामध्ये ब्रॅण्डेड डाळी व तांदळाच्या किमती पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. याविषयी याच क्षेत्रातील मंडळींच्या प्रतिक्रिया ‘सकाळ’ने जाणून घेतल्या.

किराणा 
जीएसटी लागू झाल्यानंतर सर्व प्रकारच्या ब्रॅण्डेड डाळी आणि तांदळात पाच टक्‍के वाढ होणार आहे. या दोन बाबी वगळता कोणत्याही वस्तूच्या किमतीत वाढ होणार नाही. 
- संजय कांकरिया, अध्यक्ष,  द जनरल किरणा मर्चंट असोसिएशन

सोने-चांदी 
जीएसटीमुळे सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ होणार नाही. दागिन्यांच्या मजुरीत फक्‍त पाच टक्‍के वाढ होणार आहे, तर करात ८० पैसे वाढ होणार आहे. सध्या कर दोन रुपये २० पैसे होता, आता तीन रुपये कर लागणार आहे. 
- उदय सोनी, सराफा व्यावसायिक.

चारचाकी वाहने 
छोट्या गाड्यांच्या किमती वाढणार आहेत. ही वाढ साधारणतः तीन ते सहा टक्‍के एवढी असेल. यासह प्रिमियम, सेगमेंन्ट, इन्शुरन्स, आरटीओचा खर्च वाढणार आहे.  
- विकास वाळवेकर, व्यवस्थापक, धूत ह्युंदाई.

ऑटोमोबाइल -दुचाकी
ऑटोमोबाइल क्षेत्रात दुचाकीच्या किमती साधारणतः दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत. ही वाढ संबंधित दुचाकीनुसार राहणार आहे. केवळ व्हॅटची जागा आता जीएसटी घेणार आहे. 
- राहुल पगारिया, ऑटोमोबाइल व्यावसायिक.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स 
जीएसटी कर लागू झाल्‍यानंतर टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्‍ह यांसह इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या जीएसटी लागू झाल्यानंतर पाच ते सहा टक्‍के किमती वाढणार आहेत. 
- पंकज अग्रवाल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्यावसायिक.

Web Title: aurangabad marathwada news electronic autombile rate increase