जीएसटीविरोधात राज्यभर चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - जीएसटीमुळे झालेल्या इंधन दरवाढीविरोधात ९ ते १० ऑक्‍टोबर या कालावधीत दोन दिवस राज्यभर चक्काजाम करण्यात येणार आहे. औरंगाबाद गुडस्‌ ट्रान्सपोर्ट असोसिएशननेही या आंदोलनास पाठिंबा दिला  आहे. 

औरंगाबाद - जीएसटीमुळे झालेल्या इंधन दरवाढीविरोधात ९ ते १० ऑक्‍टोबर या कालावधीत दोन दिवस राज्यभर चक्काजाम करण्यात येणार आहे. औरंगाबाद गुडस्‌ ट्रान्सपोर्ट असोसिएशननेही या आंदोलनास पाठिंबा दिला  आहे. 

औरंगाबाद असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी सर्व अडचणींवर मात करून कॅशलेस व्यवहाराला समर्थन केले. व्यावसायिक जीएसटीसाठीही प्रयत्नशील आहेत; परंतु सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक कर’ या धोरणाचा विपरित परिणाम होत असल्याने रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. जीएसटी दरवाढीमुळे व्हॅल्यू ॲडिशन आणि वन नेशन अँण्ड वन टॅक्‍सच्या सिद्धांतावर आधारित रोड परिवहन क्षेत्रामध्ये विपरित होत असल्याचेही असोसिएशने पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: aurangabad marathwada news GST oppose chakkajam