भाग्यश्री होळकरसह आरोग्य विभागाची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - पतीच्या खुनाची सुपारी देणारी व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यालय अधीक्षक पदावरून निलंबित भाग्यश्री होळकर हिला शनिवारी (ता. १६) जिल्हा परिषदेत चौकशीसाठी आणण्यात आले. तिला जिल्हा परिषदेत पोलिसांनी आणल्यानंतर अनेकांच्या ह्रदयाची धडधड वाढली. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी आरोग्य विभागापुढे मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी कपाट उघडून त्यातून एक रजिस्टर ताब्यात घेतले आणि पाच ते सहा जणांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जितेंद्र होळकर हत्याकांडातील मुख्य आरोपी भाग्यश्रीला पोलिसांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास चौकशीसाठी जिल्हा परिषदेत आणले होते. पती जितेंद्र यांच्या हत्येप्रकरणी भाग्यश्री होळकर ऊर्फ लोणे सध्या पोलिस कोठडीत आहे. खुनाची सुपारी देताना ॲडव्हान्स म्हणून १० हजार रुपये दिल्याचे तिने कबुली जबाबात सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हे पैसे कोठून आणले असे विचारले असता कार्यालयातील कर्मचाऱ्यांची भिशी चालते. लागलेल्या भिशीतून हे दहा हजार रुपये दिल्याचे सांगितले होते.

त्यावरून या भिशीसंदर्भात चौकशीसाठी शनिवारी भाग्यश्रीला जिल्हा परिषदेत नेले होते. तोंडाला स्कार्फ बांधून होळकरला आणले होते. पोलिसांचे वाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर थांबताच सर्व विभागांतून त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. 

सूत्रांनी सांगितले, की आरोग्य विभागात सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे पोलिसांनी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. भिशी चालविणाऱ्यांना भिशी चालविण्यासाठी उपनिबंधक कार्यालयातून परवानगी घेतली आहे का, किती जण यात आहेत, परवानगी का घेतली नाही अशी विचारणा केली. पोलिसांनी भिशीचे रजिस्टर ताब्यात घेतल्याचे व या संदर्भात चौकशीसाठी सहा जणांना पोलिस ठाण्यात बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news health department cheaking with bhagyashri holkar