आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा डिसेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - वर्षभरापूर्वी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत कार्गो एअरसेवा सुरू करण्यात आली. या सेवेचे विस्तारीकरण करण्यासाठी येथून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा डिसेंबरच्या अखेरीस सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे; पण यासाठी लागणारी साधन सामग्री अद्याप प्राप्त झाली नसल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद - वर्षभरापूर्वी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत कार्गो एअरसेवा सुरू करण्यात आली. या सेवेचे विस्तारीकरण करण्यासाठी येथून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा डिसेंबरच्या अखेरीस सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे; पण यासाठी लागणारी साधन सामग्री अद्याप प्राप्त झाली नसल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून देशांतर्गत एअरकार्गो सेवा सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि छोट्या उद्योजकांनी विमानतळ प्राधिकरणाकडे लावून धरली होती. तिचा वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात येत होता. तद्‌नंतर ब्ल्यू डार्ट या एजन्सीने डोमेस्टिक कार्गो एअरसेवा सुरू केली. या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एअरकार्गो सुरू होण्यापूर्वी येथील उद्योजकांना मुंबईला ट्रक आणि टेम्पोच्या मदतीने आपला माल पाठवावा लागत होता. एअरकार्गो सुरू झाल्याने उद्योजक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांना चिकलठाणा विमानतळावरच केंद्रीय शुल्काची रक्कम भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी- सुविधांची तयारी झालेली आहे. ही सेवा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्‍यता आहे. तसे वेळोवेळी कळविण्यात येईल. 
- डी. जी. साळवे, विमानतळ निदेशक, औरंगाबाद

सर्वच कामे पूर्ण 
चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू व्हावी म्हणून विमानतळ प्राधिकरणचे निदेशक डी. जी. साळवे यांचा प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. ही सेवा देण्यासाठी लागणारे मेटल डिटेक्‍टर, एक्‍सरे मशीन, कन्व्हेनर बेल्ट उपलब्ध करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत; तर एअर कार्गोच्या कार्यालयाची नुकतीच विमानतळ प्राधिकरण आणि तांत्रिक विभागाच्या पथकाने तपासणी केली आहे. या सेवेसाठी लागणाऱ्या कार्यालयाचीही निर्मिती करण्यात आली असून जवळजवळ सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीची जुळवणी करण्यात येत असून साधन सामग्री प्राप्त होताच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news international cargo service