जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

ऊर्ध्व भागातून पाणी झेपावले : पाणीसाठा गेला १८.३२ टक्‍क्‍यांवर

औरंगाबाद - नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तेथील धरणात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने नांदूर- मधमेश्वर वेअरमार्गे गोदावरीच्या पात्रात ३० हजार १६६ क्‍युसेक्‍स क्षमतेने पाणी झेपावत असून, गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी (ता. १५) रात्री उशिरापर्यंत जायकवाडीच्या पाणीसाठा आता १८.३२ टक्‍के एवढा झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्‍त केला आहे.

मराठवाड्यात पावसाची स्थिती चिंताजनक असल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. हवामान खात्याने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केल्याने शेतकरी जोमाने कामाला लागत पेरणी केली; मात्र नंतर पावसाने दगा दिला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून आहेत. दुसरीकडे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत असलेला पाणीसाठा कमी होत आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तेथील धरणे पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक भरले आहेत. त्यामुळे जायकवाडीच्या दिशेनी पाणी झेपावले असून, शनिवारी दुपारनंतर ते जायकवाडीत येऊन धडकले. गुरुवारी (ता.१३) जायकवाडी प्रकल्पात १७ टक्‍के पाणीसाठा होता; मात्र जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात जोरदार चांगला पाऊस होत असल्याने वेगाने येथे पाणी दाखल होत आहे. यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण परसले आहे. खूप दिवसानंतर वरील धरणांतून पाणी दाखल होत असल्याने आनंदात आणखी भर पडली आहे. 

मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील स्थिती
जायकवाडी     १८.३२
लोअर दुधना     ३८.८५
येलदरी     ३.१२
सिद्धेश्‍वर     ३.२३
माजलगाव     १३.९१
मांजरा     २३.४८ 
इसापूर     ३.८४
लोअर मनार     १५.८२
लोअर तेरणा     ५९.०५
विष्णुपुरी     १५.९८
सिना कोळेगाव     ०

Web Title: aurangabad marathwada news jayakwadi dam water lavel increase