पितृपंधरवड्यात ‘काकस्पर्श’ दुर्मिळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - अनंत चतुदर्शीनंतर येणाऱ्या पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते. या विधीत पिंडदान करण्यात येते. त्याकरिता ‘काकस्पर्श’ महत्त्वाचा असतो; परंतु वाढते शहरीकरण व मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची हानी होत आहे. परिणामी, शहरात कावळ्यांची काव-काव दुर्मिळ होत आहे. 

गरूड पुराणात म्हटले आहे, की पितृ पंधरवड्यात पितरांचे श्राद्ध घातल्याने पितर तृप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात. पितरांचे श्राद्ध हे भाद्रपद शुक्‍ल पौर्णिमा ते अश्‍विन कृष्ण अमावास्या या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाला स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक सणावाराला निसर्गाला प्राधान्य दिले आहे. यंदाचा पितृ पंधरवडा हा चौदा दिवसांचाच आहे. २० सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्या आहे. पितृ पंधरवड्यात पिंडीला शिवण्याकरिता कावळे आवश्‍यक असतात; परंतु वाढते शहरीकरण व निसर्गाच्या हानीमुळे दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे
पिंडदान करणाऱ्यांना तासन्‌तास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. मात्र, खेड्यातही कावळे दिसेनासे झाले आहेत. परिणामी, अगदी सह जासहजी ऐकू येणारी कावळ्यांची काव-काव आता लुप्त झाली आहे. त्यामुळे या पितृ पंधरवड्यात पिंडदान करणाऱ्यांना ‘काकस्पर्श’ दुर्मिळ बनला आहे.

नेमकी का झाली संख्या कमी
जून महिन्यात पेरणी होती. पेरणी करताना कीटक मातीतून वर येतात. कावळ्यांचे ते अन्न असते. सप्टेंबर, ऑक्‍टोबरदरम्यान पीक हाती येते. त्याने खाद्य म्हणून उपलब्ध होतात. मात्र, काही वर्षांपासून शेतीचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, कावळ्यांना सहजासहजी अन्न मिळणे अवघड झाले. शिवाय झाडांची संख्या कमी झाल्याने त्यांना घरटे करण्यास जागा राहिली नाही. यात प्रदूषण वाढले आहे. या सर्वांचा परिणाम कावळ्यांच्या संख्येवर झाला आहे.

Web Title: aurangabad marathwada news kaksparsh rare in pitrapaksha