किडनीदानाबाबतची याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

औरंगाबाद - दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्‍टर भावाला गतिमंद भावाची किडनी देण्याची परवानगी मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. हदगाव (जि. नांदेड) येथील डॉ. अतुल पवार यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. त्यांच्या एका भावाच्या किडन्या डॉ. अतुलशी जुळतात. म्हणून पवार कुटुंबीयांनी रुग्णालयात उपचाराबाबत विचारणा केली. मात्र, गतिमंद दात्याचे अवयवदान करण्यास नियमानुसार प्रतिबंध असल्याचे रुग्णालयाने सांगितले. यामुळे पवार कुटुंबीयांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानेही दाता सक्षम नसल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळली.
Web Title: aurangabad marathwada news kidney donate petition reject