प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला दिलासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

औरंगाबाद - प्रेमविवाह केल्याने खोट्या गुन्ह्यात गोवल्या गेलेल्या पती-पत्नीविरोधातील फौजदारी तक्रार खंडपीठाने रद्द केली. याचिकाकर्त्यांनी आंतरजातीय विवाह केल्यानेच त्यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. तपास अधिकाऱ्याने कुठलाही पुरावा दिला नाही. सदर फौजदारी तक्रार कायद्याचा दुरुपयोग आहे. त्यामुळे खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे व न्यायमूर्ती विभा व्ही. कंकणवाडी यांच्या पीठाने दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती मंजूर केली.

कविता व सचिन (काल्पनिक नावे) यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही आंतरजातीय विवाह केला. कविताच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या मामांनी १७ फेब्रुवारी २००५ ला कन्नड पोलिस ठाण्यात दोघा प्रेमवीरांविरोधात तक्रार दिली. तक्रारीत कविताने प्रियकराच्या सांगण्यावरून कपाटातील दागिने चोरल्याचा आळ घेण्यात आला. तक्रारीआधारे कन्नड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. विनंतीवरून कन्नड न्यायालयातून सदर प्रकरण औरंगाबाद येथे वर्ग करण्यात आले. दोघांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला. सदर फौजदारी तक्रार रद्द करण्यासाठी वर्ष २००६ मध्ये दोघांनी खंडपीठात अर्ज दाखल केला. फौजदारी कार्यवाहीला अंतरिम स्थगिती दिली. तसेच प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करण्यात आले. ॲड. रवींद्र गोरे यांनी याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद केला. संपूर्ण दोषारोपपत्रात दोघांविरोधात कुठलाही पुरावा नाही. 

घटनास्थळ पंचनामा व पाच साक्षीदारांचे जबाब एवढाच पुरावा आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळेच याचिकाकर्त्यांविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली, असे म्हणणे त्यांनी मांडले. सुनावणीअंती खंडपीठाने सदर फौजदारी तक्रार रद्द केली. ॲड. गोरे यांना ॲड. नारायण मातकर व ॲड. चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले.

Web Title: aurangabad marathwada news love marriage couple support by court