अजिंठा लेणीला पाहून भारावले महिंदा राजपक्षे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी रविवारी (ता. 29) जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली. लेणीतील कलाकृती पाहून भारावलेल्या राजपक्षे यांनी लेणीतील बारकावे गाइडकडून जाणून घेतले.

श्रीलंकेतील जागतिक वारसास्थळ असलेल्या सिगरिया येथील चित्रांमागे अजिंठा लेणीचीच प्रेरणा असल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली. पर्यटक गाइड सांडू आनंद पाटील आणि सारंग देशमुख यांनी त्यांना या बौद्ध लेणींची इत्थंभूत माहिती दिली. तत्पूर्वी अजिंठा लेणी व्ह्यू पॉइंटवरून लेणीचे विहंगम दृश्‍य त्यांनी निरखले. लेणीला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी राजपक्षे यांच्यासह सेल्फीही टिपले. त्यांनीही पर्यटकांशी मनमोकळेपणाने हस्तांदोलन केले. राजपक्षे यांच्यासह पेरिस पर्सी लक्ष्मण, भन्ते प्रशीलरत्न, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल आदींची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad marathwada news mahinda rajapaksa in ajintha cave