...तर झाला असता हाहाकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

औरंगाबाद - माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी (ता. दोन) भीषण आग लागली. त्याच वेळी कॅंटीन व शेजारी काही गॅस सिलिंडर होते. हे सिलिंडर आग लागताच काही तरुणांनी बाहेर काढून सुखरूप ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. सिलिंडर आगीत सापडले असते तर मोठा हाहाकार झाला असता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

माणिक हॉस्पिटलमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास तळमजल्यात भीषण आग लागली. घटनेची माहिती समजल्यानंतर पळापळ सुरू झाली. आगीत तेथील गॅस सिलिंडर सापडू शकतात, ही बाब काही तरुणांच्या लक्षात आली व त्यांनी तातडीने गॅस सिलिंडर बाहेर काढून मदतकार्य केले व वेळीच सिलिंडरचा संभाव्य स्फोट टाळला. एका रुग्णाला हॉस्पिटलच्या इमारतीतून बाहेर काढले जात होते. त्या वेळी त्याच्या पोटापासून छातीपर्यंत देण्यात आलेले टाके उसवले व तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला नागरिकांनी शर्थीने सुखरूप खाली उतरविले. यानंतर त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनीही हॉस्पिटलची पाहणी केली. आग प्रकरणात अद्याप तक्रार आलेली नसून आगीची नोंद मात्र झालेली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली.

हॉस्पिटलवर गुन्हा नोंदविण्याची मागणी
माणिक हॉस्पिटलने अतिक्रमण केले असून पार्किंग सुविधा नाही. तेथे फायर यंत्रणा सक्षम नाही. खाटांपेक्षा जादा रुग्णांची भरती केली गेली. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

Web Title: aurangabad marathwada news manik hospital fire