बाजार समिती संघासाठी 100 टक्‍के मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. बाजार समितीतील मतदान केंद्रात शंभर टक्‍के मतदान झाले. यामध्ये औरंगाबाद- जालना जिल्ह्यातील एका जागेसाठी भाजपप्रणीत दमोदर नवपुते, तर कॉंग्रेसप्रणीत संभाजी पाटील डोणगावकर या दोघांमध्ये चुरस दिसून आली. पुणे येथे शुक्रवारी (ता. 23) साखर संकुलात निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Web Title: aurangabad marathwada news market committee team election voting