'एमआयएम'चे वजन मीरा कुमार यांच्या पारड्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

औरंगाबाद - राष्ट्रपती निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाने "यूपीए'च्या उमेदवार मीरा कुमार यांच्या पारड्यात आपले वजन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत "एमआयएम'ची तेलंगण आणि महाराष्ट्र मिळून एकूण 2 हजार 246 मते आहेत.

तेलंगण विधानसभेत एमआयएमचे सात, तर विधान परिषदेत दोन आमदार आहेत; तर हैदराबादमधून पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे खासदार आहेत. याशिवाय पक्षाचे महाराष्ट्रातील औरंगाबाद (मध्य) आणि भायखळा येथून दोन आमदार आहेत. त्यामुळे या पक्षाचे अकरा आमदार आणि एका खासदाराच्या मतालासुद्धा खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यात एमआयएमकडे दोन आमदार आहेत. दोन आमदारांच्या मतांचे मूल्य 350 इतके होते. सध्या तेलंगण विधानसभेत एमआयएमचे 7, तर विधान परिषदेत 2 आमदार आहेत.

Web Title: aurangabad marathwada news mim support to mira kumar