...अन्‌ अडीच महिन्यांनी झाली आई-मुलाची भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सामाजिक जबाबदारी - घाटीतील बेवारस रुग्णांचा प्रश्‍न 

औरंगाबाद - घरापासून दूर असलेल्या आईची अखेर अडीच महिन्यांनी मुलाशी भेट घडून आली. यासाठी निमित्त ठरले ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त. बेवारस म्हणून उपचार घेत असलेल्या पन्नास वर्षीय महिलेला घेऊन जाताना वॉर्ड क्रमांक बारातील परिचारिका आणि कर्मचारी आनंद व्यक्त करताना भावुक झाले होते. मांडीचे हाड तुटल्याने पाच जूनपासून घाटीत उपचार घेणाऱ्या आई शोभा पांडुरंग बगाडे यांची भेट झाल्याने मुलगा विजय बगाडे यांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

‘घाटीत दिवसेंदिवस वाढताहेत बेवारस रुग्ण’ अशा मथळ्याखाली सोमवारी (ता. २१) बेवारस रुग्णांची व्यथा ‘सकाळ’ने मांडली होती. ती बातमी वाचून विजयने घाटीतील वॉर्ड क्रमांक बारा गाठला तेव्हा ठणठणीत बऱ्या होऊन घराची ओढ लागलेल्या आईची भेट झाली. तेव्हा मदत करणाऱ्या के. के. ग्रुपच्या सदस्यांचेही त्यांनी आभार मानले. याच बातमीमुळे सत्तर वर्षीय अन्साबाईला त्यांच्या नातेवाईकांनी घरी नेल्याची माहिती वॉर्ड इन्चार्ज प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ला दिली. तर ५५ वर्षीय छाया देशपांडे यांचा सांभाळ मुलगा प्रमोद करीत असून तो आता वॉर्डातील इतर रुग्णांच्या सेवेतही परिचारिकांना मदत करीत असल्याची माहिती के. के. ग्रुपचे किशोर वाघमारे यांनी दिली. 

शोभा साळवे, सिंधू थोरात, रेखा जेजूरकर, माधुरी गोजेगावे, नीलिमा कासार, सुनंदा मुळे, प्रमिला बनकर, शेख शहाबानो, प्रतिभा वाढेकर, वीरमती कामत यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’ने सामाजिक बांधिलकीतून केलेल्या वृत्तामुळे तीन बेवारस रुग्णांची त्यांच्या नातेवाईकांशी भेट घडविल्याबद्दल आभार मानले. उर्वरित बेवारस रुग्णांच्या पुनर्वसनासाठी पोलिसांच्या परवानगीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती घाटीतील समाजसेवा अधीक्षक नीलेश कोतकर यांनी दिली. 

बातमी वाचून दोन रुग्णांचे नातेवाईक शोधत आले. तो क्षण भावुक होता. दोन महिन्यांनंतर शोभा आणि अन्साबाई या ठणठणीत बऱ्या झालेल्या वयोवृद्ध महिलांना नातेवाईक घेऊन गेले. अशी वेळ कोणावरही येऊ नये. 
- प्रतिभा कुलकर्णी, इन्चार्ज, वॉर्ड १२, घाटी

Web Title: aurangabad marathwada news mother son meet after 2.5 months