पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना राष्ट्रपती पोलिस पदक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

औरंगाबाद - गुणवत्तापूर्ण सेवेसाठी औरंगाबाद शहर पोलिस दलातील निरीक्षक अविनाश लक्ष्मीनारायण आघाव यांना राष्ट्रपती पोलिस पदक घोषित झाले आहे. पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच जनसंपर्क या माध्यमातून सातत्यपूर्वक वर्षभर विविध सामाजिक जनजागृती करून विविध योजना त्यांनी राबवल्या आहेत.   

औरंगाबाद - गुणवत्तापूर्ण सेवेसाठी औरंगाबाद शहर पोलिस दलातील निरीक्षक अविनाश लक्ष्मीनारायण आघाव यांना राष्ट्रपती पोलिस पदक घोषित झाले आहे. पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच जनसंपर्क या माध्यमातून सातत्यपूर्वक वर्षभर विविध सामाजिक जनजागृती करून विविध योजना त्यांनी राबवल्या आहेत.   

शहर पोलिस दलातील जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून अविनाश आघाव कर्तव्य बजावत आहेत. पोलिस दलात १९९५ ला ते रुजू झाले. २२ वर्षे त्यांची सेवा असून यात त्यांना तब्बल एक हजार १३४ रोख बक्षिसे मिळाली आहेत. तसेच शंभर प्रशस्तिपत्रे त्यांना प्राप्त झाली आहेत. अतिउत्कृष्ट सेवेसाठी त्यांना दोनवेळा वेतनवाढ मिळाली. 

उत्कृष्ट विशेष सुरक्षा अधिकारी म्हणूनही त्यांचा दोनवेळा गौरव झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी म्हणूनही त्यांनी मान मिळवला. त्यांना यापूर्वी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहे. औरंगाबाद पोलिस दलातील कर्तव्यदक्ष तसेच प्रभावी जनसंपर्क असलेले अधिकारी म्हणून श्री. आघाव यांची ओळख आहे. त्यांनी औरंगाबाद पोलिस दलात आर्थिक गुन्हे शाखेचा भार सांभाळला. यात केबीसी या गाजलेल्या घोटाळ्याचा तपास त्यांनी सुयोग्य केला. तसेच गुन्हे शाखेतही त्यांचा दरारा आहे.

आघाव यांची कामगिरी
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २००८-०९ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिस ठाणे ढोकी तसेच २००९-१० मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन पोलिस ठाणे या राजकीय, सामाजिक व संवेदनशील ठाण्याचे अधिकारी म्हणून कार्यरत असताना सर्वात जास्त गावे तंटामुक्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी समाज व त्यांची समस्या, गुन्हेगारी उपाययोजना हा प्रबंध पोलिस महासंचालकांना सादर केला. हा प्रबंध राज्यातील सर्व पोलिसांसाठी उपयुक्‍त ठरला.

सातत्यपूर्वक दोन वर्षांपासून कॉपीमुक्त परीक्षा केंद्र अभियान राबवले. या कार्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून श्री. आघाव यांची कौतुकास्पद दखल घेण्यात आली.

Web Title: aurangabad marathwada news president award to avinash aghav