अहिंसानगर भागातील कुंटणखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

औरंगाबाद - बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मिळालेल्या खबरीवरून गुन्हे शाखेच्या सहकार्याने अहिंसानगरातील कुंटणखान्यावर रविवारी (ता. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास छापा टाकला. यात पथकाने तीन पीडितांना ताब्यात घेत आंटीसह ग्राहकाला अटक केली. 

महापालिकेच्या एका विरोधी पक्षाची माजी पदाधिकारी असलेली शोभा वसंत शुक्‍ला (वय ५६) अहिंसानगरातील बिल्डिंग क्रमांक १४ मध्ये आपल्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार दुपारी पथकातील उपअधीक्षक भरत गाढे, निरीक्षक अनिलकुमार जाधव, उपनिरीक्षक भारत माने, पाशा शेख, अप्पासाहेब सानप, सतीश बहिरवाल, नीलावती खटाणे, रेखा गोरे, सोनाली चौरे, मीना घोडके आणि विकास नेवडे यांनी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे आणि बापूराव बावस्कर यांच्या मदतीने शुक्‍लाच्या घरावर छापा मारला. यात राजेंद्र दहाडे या ग्राहकासह आंटी शोभा शुक्‍ला हिला अटक केली; तसेच मोबाईल आणि साडेपाच हजारांचा ऐवज हस्तगत केला. तर तीन पीडित महिलांना ताब्यात घेतले. 

रात्री त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: aurangabad marathwada news raid on prostitution in ahinsanagr area