औरंगाबाद शहरात सायंकाळी पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - जवळपास दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. १९) शहरासह जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. रात्री साडेआठपर्यंत शहरात १२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सर्वांना पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. 

दरम्यान, ढगाळ वातावरण आणि वातावरणात वारे शांत असल्याने शुक्रवारी (ता. १८) पाऊस येण्याची शक्‍यता वाटत होती, मात्र पाऊस आला नाही. शनिवारी दुपारी तीनपासून रिमझिम पावसाला सुरवात झाली. रात्री साडेआठनंतर पावसाचा जोर वाढला. या पावसामुळे चाकरमान्यांची चांगली धांदल उडाली. कामावरून घरी परतणाऱ्यांनी मोठ्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. कॅनॉट परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास एक झाड पडले. यात कोणतीही हानी झाली नाही. या घटनेशिवाय अन्यत्र हानी झाली नसल्याचे अग्निशामक विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: aurangabad marathwada news rain