शेकडो घरांत घुसले पाणी

औरंगाबाद - निराला बाजार परिसरात एका दुकानाची भिंत कोसळली.
औरंगाबाद - निराला बाजार परिसरात एका दुकानाची भिंत कोसळली.

औरंगाबाद - शहरात १३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाची बुधवारी (ता. २०) पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली. तीन तास मुसळधार पडलेल्या पावसाने शेकडो घरे, दुकानांमध्ये पाणी घुसून हाहाकार उडाला. मदतीसाठी अग्निशामक विभागाचे फोन खणखणले. मदतीची तत्परता दाखविण्यात आली; मात्र रात्री उशिरापर्यंत नूर कॉलनी, स्वप्ननगरी, जयभवानीनगरसह अनेक वसाहतींमधील घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले होते. रस्त्यांवरील पाण्याचे तळे कायम असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.  
शहरात १३ सप्टेंबरला पावसाने हाहाकार उडाला होता. जयभवानीनगरसह गारखेडा, सातारा परिसरात शेकडो घरे, दुकानांमध्ये पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या. 
प्रत्यक्षात कारवाई झालेली नाही. त्यात पुन्हा एकदा बुधवारी पावसाने दणका दिला. त्यामुळे नाल्याकाठच्या शेकडो घरांमध्ये पाणी घुसून हाहाकार उडाला. सखल भागांमध्ये अक्षरक्षः गुडघाभर पाणी साचलेले होते. नागरिकांनी तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशामक विभागाला फोन केले. 

तासाभरात सुमारे २० कॉल आल्याने अग्निशामक यंत्रणेला देखील मदतीसाठी धावपळ करावी लागली. जयभवानीनगरात तातडीने मदतीसाठी गाड्या पाठविण्यात आल्या; तसेच विकासनगर उस्मानपुरा, सिडको एन- चार डी सेक्‍टर, सहकारनगर, दशमेशनगर, अंबिकानगर, मुकुंदवाडी, गजानननगर, दादा कॉलनी, मल्हार चौक गारखेडा परिसर, झी मार्केट निराला बाजार, पारिजातनगर सिडको एन- चार, औषधीभवन दलालवाडी, शरद हॉटेल टीव्ही सेंटर, नूर कॉलनी, गुलमोहर कॉलनी सिडको एन- पाच, तापडिया पार्क सिडको एन- चार सिडको भागातील शेकडो घरे, दुकानांत पाणी घुसले होते.

प्रोझोन मॉलसमोर असलेल्या एका गॅस एजन्सीच्या कार्यालयातही पाणी घुसले होते. ज्योतीनगर भागात एक झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

फकीरवाडीत शंभर वर्षांपूर्वीचे घर कोसळले
फकीरवाडी भागात शंभर वर्षांपूर्वीचे ‘शंकर निवास’ हे जुने घर कोसळले. घरात कोणी रहात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घराशेजारील नागरिकांना नगरसेवक राजू तनवाणी, रवी कावडे, मुकेश जाधव यांनी मदत करून तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com