हॉकर्सवर कारवाई करताना शूटिंग करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - एसटी बसस्थानकावर परवानाधारक विक्रेते, हॉकर्स आणि दुकानदार यांच्यावर कारवाई करताना वाद होण्याचे प्रकार होतात, म्हणून यापुढे कुठल्याही विक्रेत्याच्या विरोधात कारवाई करताना त्याचे शूटिंग करावे, असा आदेश एसटी महामंडळाने अधिकाऱ्यांना दिला आहे.  

औरंगाबाद - एसटी बसस्थानकावर परवानाधारक विक्रेते, हॉकर्स आणि दुकानदार यांच्यावर कारवाई करताना वाद होण्याचे प्रकार होतात, म्हणून यापुढे कुठल्याही विक्रेत्याच्या विरोधात कारवाई करताना त्याचे शूटिंग करावे, असा आदेश एसटी महामंडळाने अधिकाऱ्यांना दिला आहे.  

एसटी महामंडळाने राज्यभरातील बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी कॅंटिन, ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लरसह काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवाने दिलेले आहेत. याशिवाय खारी, पाणी बॉटल, चिक्की, बिस्किटे, चिफ्स, गोळ्या-चॉकलेट विक्रेत्यांना फिरते परवानेही देण्यात आलेले आहेत. बसस्थाकावरील या परवानाधारक विक्रेत्यांसाठी नियमावली केलेली आहे; मात्र अनेक विक्रेते नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना त्रास देत असतात. ठराविक जागेत आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशापद्धतीने विक्रेत्याने व्यावसाय करणे अपेक्षित आहे; पण काही विक्रेते जास्त पैसे मिळविण्यासाठी सर्रास नियम मोडतात, परवानगी नसलेले पदार्थ विक्री करतात, बसस्थानकावरील जागेत अतिक्रमण करतात, या विक्रेत्यांवर आगारप्रमुख, बसस्थानकप्रमुख आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली जाते. 

वेळप्रसंगी मालाची जप्ती आणि परवाना निलंबितही केला जातो. अशा कारवाईच्या वेळी विक्रेते आक्षेप घेतात, प्रसंगी वाद करून अधिकाऱ्यांना हुसकावण्यासाठी प्रयत्न करतात. अनेकजण दबाव आणून अधिकाऱ्यांना त्रस्त करतात, म्हणून यापुढे प्रत्येक कारवाईच्या वेळी मोबाईलमधून शूटिंग करून घेण्याचे आदेश मंडळाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news Shooting while taking action on the Hawkers

टॅग्स