‘स्मार्ट सिटी’चे मेंटॉर बदलले
औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मेंटॉर म्हणून आता उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवार यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.
औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मेंटॉर म्हणून आता उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवार यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात औरंगाबादची निवड होऊन वर्ष उलटले आहे. त्यानंतर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड या विशेष उद्देश वहनची (एसपीव्ही) नोंदणी करण्यात आली. या कंपनीच्या संचालक मंडळावर शासन नियुक्त संचालक आणि कंपनीचे मेंटॉर म्हणून उद्योग विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तीन बैठकाही झाल्या; मात्र दरम्यानच्या काळात श्री. चंद्रा यांची उद्योग विभागातून नियोजन विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांना स्मार्ट सिटीच्या कामासाठी वेळ मिळत नसल्याने श्री. चंद्रा यांनी मेंटॉरपदाची जबाबदारी कमी करावी, अशी विनंती शासनाला केली होती. त्यामुळे शासनाने औरंगाबादच्या स्मार्ट सिटीच्या मेंटॉरपदी प्रधान सचिव सुनील पोरवाल यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितली.