गुणपत्रिका मिळाल्या; विद्यार्थ्यांचा ‘कल’ कळेना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

दहावीच्या कलचाचणीचा निकाल रेंगाळला, विद्यार्थी-पालक गोंधळात 

औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १३ जूनला दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. शनिवारी (ता. २४) विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटपही करण्यात आले. दरम्यान, कलचाचणीचे निकालपत्र अद्याप मिळाले नाही. त्यामुळे आपल्या पाल्याचा कल कुठल्या शाखेकडे आहे, त्याने कुठे प्रवेश घ्यावा, कोणते विषय निवडावेत हे ठरविताना पालकांची दमछाक होत आहे.

विद्यार्थ्यांचा कल कशाकडे आहे, याच्या तपासणीसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणी देणे अनिवार्य केले होते. बोर्डातर्फे शनिवारी दहावीच्या गुणपत्रकासोबतच कलचाचणीचे निकालपत्रक शाळांना देण्यात येणार होते. त्यानंतर त्यांचे शाळांत वाटप केले जाणार होते. यावरून आपल्या पाल्याला कोणत्या शाखेत रस आहे हे पाहून पालकांना विद्यार्थ्यांच्या पुढच्या प्रवेशाची निश्‍चिती करता येते. मात्र, शहरातील काही शाळांना गुणपत्रिकेबरोबर कलचाचणीचे निकालपत्रक मिळाले नसल्याचा प्रकार घडला. दरम्यान, विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांनी विचारणा केल्यानंतर गुणपत्रिकांच्या गठ्ठ्यासोबत बोर्डाकडूनच ते आले नसल्याचे शाळांतर्फे मुख्याध्यापकांनी सांगितले. मात्र, असे नसून बोर्डातील अधिकाऱ्यांनी या गंभीर चुकीचे खापर शाळांवर फोडत निकालपत्रकासोबत दिल्याचे सांगितले. उलट ज्या शाळांनी कलचाचणीचे निकालपत्र नेले नाही, अशा शाळांनी बोर्डात येऊन घेऊन जावे असे सुचविले.  

शहरातील एका जिल्हा वितरण केंद्रावर गुणपत्रिकांसोबत कलचाचणीचेही निकालपत्र देण्यात आले होते. ज्या शाळेला निकालपत्र मिळाले नाही, अशा शाळांना बोर्डात देण्यात येईल. 
- वंदना वाहूळ, विभागीय सचिव, परीक्षा मंडळ, औरंगाबाद.

Web Title: aurangabad marathwada news student career