अनुदान घेतले तरीही उघड्यावरच...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

प्रशासनाने केली अनुदान लाटणाऱ्या पाचशे जणांची यादी 

औरंगाबाद  - स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत शहर पाणंदमुक्‍त करण्यासाठी शासनातर्फे महापालिकेमार्फत वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र काहीजणांनी अनुदानाचा पहिला हप्ता घेऊनही वैयक्तिक स्वच्छतागृह बांधले नाही. अशा अनुदान लाटणाऱ्या ५०० जणांची यादी प्रशासनाने तयार केली असल्याचे महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.  

स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत शहरात ज्यांच्याकडे स्वच्छतागृह नाही, त्यांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान दोन टप्प्यांत देण्यात येते. स्वच्छतागृह मंजूर झाल्यानंतर सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा झाल्यानंतर त्यांनी बांधकाम केल्यानंतर अनुदानाचा दुसरा हप्ता दिला जातो. सात हजार वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट होते; मात्र हे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. अनेक लाभार्थ्यांनी अनुदान घेऊनही स्वच्छतागृह बांधले नाही, यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत महापालिकेला सर्वांत कमी गुण मिळाले होते. यामुळे महापालिका प्रशासनाने ज्यांनी अनुदान घेतले आहे; परंतु स्वच्छतागृह बांधले नाही अशा ५०० लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. या लाभार्थ्यांवर कारवाईची शक्‍यता आहे. 

Web Title: aurangabad marathwada news subsidy for toilet