वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासनाने बांधली मोट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

औरंगाबाद - शहरातील वाहतुकीचा गंभीर प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. एक मोट बांधून आधी रस्ते, स्ट्रीटलाईट, सिग्नल्ससह वाहतुकीच्या विविध सेवा पुरवण्यावर भर देण्यात येणार आहे. वाहतूक अधिकाधिक सुकर करून नागरिकांना त्रासातून मुक्त करण्यासाठी पाऊल टाकले जाणार असल्याचे बैठकीतून संकेत मिळाले आहेत.

औरंगाबाद - शहरातील वाहतुकीचा गंभीर प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. एक मोट बांधून आधी रस्ते, स्ट्रीटलाईट, सिग्नल्ससह वाहतुकीच्या विविध सेवा पुरवण्यावर भर देण्यात येणार आहे. वाहतूक अधिकाधिक सुकर करून नागरिकांना त्रासातून मुक्त करण्यासाठी पाऊल टाकले जाणार असल्याचे बैठकीतून संकेत मिळाले आहेत.

वाहतूक सल्लागार समितीची पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २७) पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. यात सर्वच उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग होता. शहराची वाहतूक समस्या अत्यंत बिकट असून, चार नव्या उड्डाणपुलांच्या निर्मितीनंतरही वाहतुकीचा प्रश्‍न कायम आहे. अशा स्थितीत वाहतूक समस्येवर बैठकीत खल झाला. या समस्या सोडवून वाहतूक अधिकाधिक सुकर करण्यासाठी सर्वच प्रशासकीय अधिकारी प्रयत्नशील आहेत. रस्ते व वाहतुकीसाठी संबंधित विभागांनी करायच्या कामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सिडकोचे मुख्य प्रशासक तसेच महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, पोलिस उपायुक्त दीपाली धाडे-घाडगे, जागतिक बॅंक, सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वच विभागांचे उच्चपदस्थ बैठकीत सहभागी होते.

कुणाची काय कामे...

महापालिका : रस्त्यांची दुरुस्ती, दुभाजक टाकणे, दुभाजकांची दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन, लेन मार्किंग, रस्त्यावर पिवळे पट्टे, सिग्नलची दुरुसती, अत्याधुनिक संगणकीय नियंत्रण व समन्वय, रिक्षा स्टॅंडला ना हरकत देणे, हॉकर्स झोन घोषित करणे, बीड बायपास रस्त्याला सर्व्हिस रस्ता तयार करणे, चौकांचे सुशोभीकरण, अतिक्रमण आदी कामे करावी लागणार आहेत.

जागतिक वर्ल्ड बॅंक : बीड बायपास रस्त्यावरील सर्व चौकांत विशेषत: महानुभाव आश्रम, एमआयटी चौक, गोदावरी टी पॉइंट, देवळाई चौकात झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन लेन मार्किंग, अतिक्रमण यासंबंधी कामाबाबत चर्चा झाली.

सार्वजनिक बांधकाम विभाग : जालना रस्त्यावरील डांबरीकरण, दुभाजक, झेब्रा क्रॉसिंग, उड्डाणपुलासंबंधी दुभाजक, रस्त्यांचे रुंदीकरण या मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विभाग व बीएसएनएलसंबंधी शहरातील वाहतुकीस अडथळा करणारे खांब काढणे अशा सर्वकष मुद्‌द्‌यांवर बैठकीत चर्चा झाली. या कामाबाबत संबंधित विभागांना कामे तत्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: aurangabad marathwada news tranport develope y administrative planning