विमान उड्डाणात झाडांचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीला आडथळा ठरलेली झाडे तोडण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने अनेक शेतकऱ्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. मात्र, मोबदला मिळाला तरच झाडे काढण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीला आडथळा ठरलेली झाडे तोडण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने अनेक शेतकऱ्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. मात्र, मोबदला मिळाला तरच झाडे काढण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या परिसरातील अनेक झांडांमुळे विमान उड्डाणाला धोका निर्माण होत आहे. धावपट्टीच्या दिशेने असलेली अनेक सरळ व उंच झाडे, विमान उतरण्यासाठी आणि उड्डाणासाठी अडथळा निर्माण करीत असल्याच्या तक्रारी विविध एअरलाइन्सचा वैमानिकांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केल्यात. या तक्रारींची दखल घेऊन सदर झाडे तोडण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअनुषंगाने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाला अडथळा ठरणाऱ्या झाडांची पहाणी करून अहवाल दिला आहे. त्यानुसार तातडीने धावपट्टीच्या सरळ रेषेमध्ये आणि विमानतळाच्या सरंक्षक भिंतीजवळच्या झाडांची यादी तयार केली आहे. यादी तयार करून विमानतळ प्राधिकरणाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार मुकुंद देविदास नवपुते (गट नं. ५३५), विश्वनाथ लक्ष्मण दहिहंडे (गट नं. ५३६), रमेश रामा दहिहंडे (गट नं. ५३७), साईनाथ रंगनाथ दहिहंडे (गट नं. ५३८) या शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या. नोटिसा मिळताच शेतकऱ्यांनी विमानतळ प्राधिकरणचे निदेशक डी. जी. साळवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमच्या शेतीतील चिंच, आंबा, बोर, साग, लिंब, जाम, जांभूळ अशा फळझाडांची शेती विभागातर्फे सर्वेक्षण करून त्याचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: aurangabad marathwada news tree Obstacle in plane flight