सातव्या दिवशीही पाण्यासाठी ओरड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतलेल्या ३६ तासांच्या शटडाऊनंतर मंगळवारी (ता. दहा) सातव्या दिवशीदेखील शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्वपदावर आलेले नाही. अनेक भागांत चार ते पाच तास उशिराने पाणी आल्यामुळे नागरिकांना ताटकळावे लागले. दरम्यान, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्वपदावर येत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. 

महापालिकेने विद्युत उपकेंद्र व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून (ता. सहा) तब्बल ३६ तासांचा शटडाऊन घेतला होता. शनिवारी (ता. सात) रात्री अकरा वाजता हा शटडाऊन संपला. त्यानंतर अद्यापपर्यंत शहरातील पाण्याचे वांधे कायम आहेत. शटडाऊनमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलले होते; मात्र सोमवारपर्यंत (ता. नऊ) काही भागांना पाणी मिळाले नसल्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. मंगळवारीदेखील अनेक वसाहतींमध्ये नियमित वेळेपेक्षा चार ते पाच तास उशिराने पाणी आले. याबाबत कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले, ‘‘शुक्रवारी व शनिवारी ज्या भागातील वसाहतींचा पाणीपुरवठ्याचा टप्पा होता, त्यांना रविवार व सोमवारी पाणीपुरवठा झाला. सोबतच या दिवसात ज्या वसाहतींचा पाणीपुरवठ्याचा टप्पा होता, त्यांनाही पाणीपुरवठा करण्यात आला. या वसाहतींना नियमित वेळेच्या पाच ते सहा तास उशिराने पाणीपुरवठा झाला. ज्या वसाहतींना टप्पा देता आला नाही, नियमित वेळापत्रकासोबतच त्या वसाहतींनाही मंगळवारी (ता. दहा) पाणी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वीस एमएलडी गळती कायम
जायकवाडी धरणातून सध्या १५५ एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे; मात्र त्यापैकी दहा एमएलडी पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतून वाया जाते. उर्वरित १५ ते २० एलएलडी पाण्याची गळती कायम आहे. जागोजागी व्हॉल्व्ह लिकेज, मुख्य वाहिनीतून पैठण रोडवरून पाण्याच्या चोरीचे प्रकार सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. यामुळे शहरात येणाऱ्या पाण्याची तूट वाढली आहे.

Web Title: aurangabad marathwada news water shortage