esakal | Aurangabad : महावितरणच्या अधिकाऱ्यांना मधुर मिठाई मालकांची शिवीगाळ
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitran

Aurangabad : महावितरणच्या अधिकाऱ्यांना मधुर मिठाई मालकांची शिवीगाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : वीज बिलाच्या वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना मधूर मिलन मिठाईच्या दोघा मालक भावांनी शिवीगाळ करत कॉलर पकडून हात-पाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (ता. ११) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन रस्त्यावरील मधूर मिलन मिठाई या दुकानात घडला.

रेल्वे स्टेशन रस्त्यावर डुंगरसिंग हिरालाल राजपुरोहित याचे सच्चाई फुडस प्रॉडक्टस नावाचे दुकान आहे. त्याच्याकडे महावितरणची एक लाख दोन हजार ८६० रुपये थकबाकी आहे. त्याच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी विजबिल भरण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र, तो नेहमी बिल भरण्यास टाळाटाळ करु लागला. तत्पुर्वी त्याने १७ ऑगस्ट रोजी महावितरणला ५० हजाराचा चेक दिला होता. मात्र, चेक वटलाच नाही. त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने शनिवार पर्यंतची मुदत मागितली होती.

हेही वाचा: हे तू काळी आहे, असे हिणवत असल्याने विवाहितेने घेतला गळफास

त्यामुळे आज अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाणे, सहायक अभियंता सुनील सातदिवे व वरिष्ठ तंत्रज्ञ अर्जुन वैद्य असे राजपुरोहितच्या दुकानावर गेले. तेव्हा त्याच्याकडे विजबिलाच्या चेकबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने पुर्वीचा ५० हजारांचा चेक परत देण्याची मागणी केली. त्यावेळी तो चेक वटला नसल्यामुळे सध्या तो आपल्याकडे नाही असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्याच्यासह भाऊ राजूसिंग राजपुरोहित याने श्री. सातदिवे यांची कॉलर पकडून त्यांना जोरात ओढले. दोघांनी हात-पाय तोडण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजूसिंगला अटक करण्यात आली असल्याचची माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली आहे.

loading image
go to top