औरंगाबाद-मुंबई विमानात बिघाड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

औरंगाबादहुन मुंबईला जाणाऱ्या औरंगाबाद-मुंबई-दिल्ली या विमानात सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच विमानात बिघाड झाल्याचं लक्षात आले. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने अभियंत्यांनी तातडीने पाहणी केली.

औरंगाबाद : औरंगाबाद-मुंबई विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

औरंगाबादहुन मुंबईला जाणाऱ्या औरंगाबाद-मुंबई-दिल्ली या विमानात सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच विमानात बिघाड झाल्याचं लक्षात आले. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने अभियंत्यांनी तातडीने पाहणी केली. तेव्हा विमान उड्डाण करू शकणार नाही हे जाहीर करण्यात आले.

विमानात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार नारायण कुचे, विकास जैन यांच्यासह 93 प्रवासी होते

Web Title: Aurangabad-Mumbai flight technical problem