महापालिकेचा दंडक सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

औरंगाबाद - अडीच महिन्यांनंतरही कचराकोंडीवर तोडगा निघत नसल्याने महापालिकेने दंडात्मक करवाईचा धडाका सुरू केला आहे. आठ हॉटेल व २५ दुकानदारांकडून सुमारे ४७ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाई करण्यात आलेल्या हॉटेलांच्या यादीत हॉटेल अजंता ॲम्बेसेडर, रिलायंस मॉलचा समावेश आहे. 

शंभर किलोपेक्षा जास्त कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो त्यांनी स्वतःच त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. कचराकोंडीनंतर प्रशासनाने त्यानुसार आदेश काढले होते; मात्र त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. बहुतांश ठिकाणचा कचरा आजही रस्त्यावर फेकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तपासणी सुरू केली आहे. ता. २३ एप्रिल ते २ मेदरम्यान शहरातील १८ हॉटेल व मॉलची तपासणी करण्यात आली. त्यात कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या आठ हॉटेल, मॉलला २२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्या सुमारे २५ दुकानदार व व्यापाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यापुढेहीही कारवाई सुरू राहणार असून, मंगल कार्यालये, हौसिंग सोसायट्या व व्यापारी संकुलांचीही तपासणी केली जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी, आरोग्य विभाग तसेच सीआरटी संस्थेच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे मोहीम राबवून ही कारवाई केली.

दंड वसूल केलेले हॉटेल, मॉल
हॉटेल अजंता ॲम्बेसेडर - पाच हजार 
जिमखाना क्‍लब - पाच हजार 
हॉटेल शिवनेरी - दोन हजार 
लेमन ट्री - एक हजार 
रिलायंस मॉल - पाच हजार 
एमजीएम सॉल्ट - दोन हजार 
हॉटेल आंगेठी - एक हजार 
हॉटेल विंडसर कॅसल - एक हजार

Web Title: aurangabad municipal fine hotel mall