महापालिका आयुक्तच उतरले नाल्यात

माधव इतबारे
बुधवार, 18 डिसेंबर 2019

एका ठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीग पडलेला होता. नाल्याची ही दुरवस्था पाहताच आयुक्त पांडेय नाल्यात उतरले. सोबतचे अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांना बोलावत त्यांनी कचरा उचलून हा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वतः कचरा उचलण्यास सुरवात केली.

औरंगाबाद- महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. 18) स्वतः नाल्यात उतरत गांधीगिरी केली. अधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी अर्ध्या तासात नाल्यातील कचरा उचलल्याचा प्रकार मिसारवाडी भागात घडला. 

महापालिका आयुक्त म्हणून आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी गेल्या आठवड्यात पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी नागरिकांना सोबत घेऊन शहराच्या चित्र बदलू, असे जाहीर केले होते. बुधवारी मिसारवाडी भागात आयुक्तांनी नागरिकांना नालेसफाईसाठी समोर येण्याचे आवाहन केले मात्र नागरिकांनाचा प्रतिसाद मिळाला नाही, शेवटी आयुक्तांना अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नाल्याची सफाई करावी लागली. घडले असे की... मिसारवाडी वॉर्डातील आरतीनगरात पाहणी करताना आयुक्तांना जागोजागी रस्त्यावर कचरा पडलेला, दुर्गंधी पसरलेली दिसली. यातच त्यांचे लक्ष या भागातील बाजूच्या नाल्याकडे गेले. नाल्याजवळ जाऊन पाहताच त्यांना नाला कचऱ्याने भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !  

एका ठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीग पडलेला होता. नाल्याची ही दुरवस्था पाहताच आयुक्त पांडेय नाल्यात उतरले. सोबतचे अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांना बोलावत त्यांनी कचरा उचलून हा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वतः कचरा उचलण्यास सुरवात केली. ते पाहून नेहमी अधिकारी अन्‌ नगरसेवकांनाही काम करावे लागले. अर्धा तास नाल्याची स्वच्छता झाली. दरम्यान आयुक्तांनी नागरिकांसोबत संवाद साधला. त्यात आंबेडकरनगर, मिसारवाडी येथील काही नागरिकांनी मालमत्ता कर जास्त असल्याचे सांगत आम्ही तो भरू शकत नाही. वर्षाला 400 ते 500 रुपयेच घरपट्टी आमच्याकडून घ्या, अशी विनंती केली. 

फाइव्हस्टार हॉटेल बांधण्याचे तुमचे नाही काम 
मिसारवाडी, आरतीनगरातील भागातील दुर्गंधी पाहून आयुक्त चांगलेच भडकले. त्यांनी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावत शहरात फाइव्हस्टार हॉटेल अन्‌ बंगले उभारणे हे आपले काम नाही तर शहर स्वच्छ करणे, कचरा उचलणे, वेळेत पाणी देणे, ड्रेनेज साफ करणे हेच काम आहे, अशा शब्दात कर्तव्याची जाणीव करून दिली. 

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा  
 
लोकवर्गणीतून करा कामे 
आरतीनगरातही नागरिकांनी आयुक्तांकडे कैफियत मांडली. याठिकाणी मुख्य मलजल वाहिनीला अंतर्गत ड्रेनेजलाइन जोडण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. महापालिकेनेच हे काम करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यावर आयुक्त पांडेय म्हणाले, महापालिकेकडे कधीही पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही लोकवर्गणीतून ड्रेनेज जोडण्याचे साहित्य आणा. तुम्हाला महापालिकेचे कर्मचारी देतो, अशी सूचना आयुक्तांनी नागरिकांना केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News