esakal | VIDEO : अरेच्चा! कोंबडीशिवाय जन्मतात पिले! 
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : मध्यवर्ती अंडी उबवणुक केंद्रात तयार झालेली एक दिवसाची पिले.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह धुळे आणि नगर जिल्ह्यांसाठी औरंगाबाद केंद्रातून काम चालते. कुक्‍कुटपालनाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने हे केंद्र चालवण्यात येते. 

VIDEO : अरेच्चा! कोंबडीशिवाय जन्मतात पिले! 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद - अंडी उबवून कोंबडी पिलांना जन्म देते; मात्र कोंबडीशिवाय पिलांना जन्माला घालण्याचे काम पडेगाव येथील मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्रामध्ये करण्यात येत आहे. गेल्या 57 वर्षांपासून या ठिकाणी कोंबडीशिवाय पिले तयार केली जात आहेत.

शिवाय या केंद्राच्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरू करण्यास इच्छुक युवक, शेतकरी एवढेच नव्हे, महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना कुक्‍कुटपालन व्यवसाय करायचा झाल्यास शासकीय दरात एक दिवसाची पिले उपलब्ध करून देण्यात येतात. गेल्या सात वर्षांत जवळपास दोन हजार लोकांना या ठिकाणी कुक्‍कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

पशुसंवर्धन विभाग आयुक्‍तालयाच्या मार्गदर्शनाखाली पडेगाव येथे मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र कार्यरत आहे. राज्यात औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आणि पुणे या चार ठिकाणी अशी केंद्र आहेत. औरंगाबादमध्ये 1962 मध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरवातीला खडकेश्‍वर येथे असलेले केंद्र 1965 मध्ये पडेगाव येथे स्वतंत्र जागेत स्थलांतरित करण्यात आले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह धुळे आणि नगर जिल्ह्यांसाठी औरंगाबाद केंद्रातून काम चालते. कुक्‍कुटपालनाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने हे केंद्र चालवण्यात येते. 

असे का घडले : हेलपाटे मारुन मिळवलेले सौर कृषी पंप बंद 

कमी खुडूक होणाऱ्या "ग्रामप्रिया' पिलांची पैदास 

या केंद्रात यापूर्वी वनराज, गिरिराज, कलिंगा ब्राऊन या पिलांची पैदास केली जायची. सध्या ग्रामप्रिया या जातीची पिले तयार केली जातात. या जातीच्या कोंबड्या वर्षाला 180 ते 200 अंडी देतात. या कोंबड्यांमध्ये खुडूक होण्याचे प्रमाण (अंडी देणे बंद होण्याचा काळ) फार कमी असतो. तर नर कोंबड्याचे मांस खाण्यासाठी गावरानसारखे असते. यातून अंड्यासाठी आणि ब्रॉयलर म्हणून विकण्यासाठी दोन्ही उद्देशांसाठी शेतकरी व स्वयंरोजगार करणाऱ्यांना ते फायदेशीर ठरत आहेत. नराचे वजन तीन ते साडेतीन किलो, तर मादीचे अडीच ते तीन किलो इतके असते. 

महत्वाची बातमी : औरंगाबाद महापालिकेत ब्रेकपची तयारी...

आठवड्याला 7 ते 8 हजार पिले 

या केंद्रामध्ये कोंबडीशिवाय मशीनवर पिले तयार केली जातात. गेल्या वर्षी अडीच लाख पिलांची विक्री करण्यात आली. आठवड्याला सात ते आठ हजार, तर महिन्याला सुमारे 25 हजार पिले तयार केली जातात. तसेच महिन्याला 30 ते 35 हजार अंडी उत्पादित होतात. सध्या या केंद्रात 5 ते 6 हजार कोंबडे आणि कोंबड्या आहेत. अंड्यातून पिले तयार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहे. बायोसेक्‍युरिटी झोनमध्ये एकाचवेळी 30 हजार अंडी उबवणुकीसाठी ठेवता येतील, अशी व्यवस्था आहे. एका इन्क्‍युबेटरमध्ये एकावेळी 15 हजार अंडी 18 दिवस ठेवण्यात येतात. नंतर पुढचे तीन दिवस ती हॅचरमध्ये ठेवली जातात. इन्क्‍युबेटरमधून काढून हॅचरमधील ट्रेमध्ये अंडी ठेवल्यानंतर तीन दिवसांत पिले अंडी फोडून बाहेर येतात. अशी एक दिवसाची पिले पोल्ट्री व शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार विकली जातात. शेतकऱ्यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून किंवा पूर्णवेळ पोल्ट्रीचा व्यवसाय केला तरी तो फायदेशीर ठरू शकतो, असे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. गोरे यांनी सांगितले. 

जाणून घ्या : ऑनलाईन व्यवहारात तरुणीला चार लाखाचा गंडा 

स्वयंरोजगाराकडे वाढता कल 

या केंद्राचे सहायक आयुक्‍त डॉ. के. ए. पटेल यांनी सांगितले, की कुक्‍कुटपालनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना या केंद्रामार्फत एक आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाते. 35 वर्षांखालील बेरोजगारांना नाममात्र शुल्कामध्ये प्रशिक्षण दिले जाते. खुल्या प्रवर्गातील प्रशिक्षणार्थींना 200 तर मागासवर्गीयांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येते. प्रशिक्षण काळात कोंबड्यांच्या जाती, त्यांचे संगोपन, लसीकरण, त्यांची निगा कशी राखावी, अंड्यांसाठीच्या कोंबड्या, मांसल कोंबड्या कोणत्या याविषयी पूर्ण प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर ज्यांना हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना एक दिवसाची पिले 20 रुपये 60 पैसे प्रति पिलू या शासकीय दराने उपलब्ध करून दिली जातात. कुक्‍कुटपालन करण्यास इच्छुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांना नावीन्यपूर्ण योजना, विशेष घटक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक दिवसाच्या पिलांची शासकीय दराने विक्री करण्यात येते. 

गेल्या सात वर्षांतील प्रशिक्षणार्थींची संख्या 

  • 2013-14 : 253 
  • 2014-15 : 297 
  • 2015-16 : 292 
  • 2016-17 : 294 
  • 2017-18 : 305 
  • 2018-19 : 356 
  • 2019-20 : 150 (आजपर्यंत) 
     
loading image