'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

औरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद महापालिकेच्या शाळांची स्थिती चांगली आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुरुवारी (ता. 17) सांगितले. शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी ठेवावा, अशी सूचना त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना केली. 

मराठी माध्यमाच्या शाळांना अधिक बळकटी देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी मुंबईत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई, ठाणे, कल्याण व औरंगाबाद महापालिकेच्या महापौर व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते. ठाकरे यांनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी देशमुख यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार गुरुवारी ते शहरात आले व महापालिकेच्या काही शाळांची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेतली. महापौर घोडेले, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य उपस्थित होते. बैठकीनंतर लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, की महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. खासगी शाळांशी स्पर्धा व्हावी, यादृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेची वर्गखोली डिजिटल झाली पाहिजे, कौशल्य विकास केंद्र सुरू केले पाहिजे, प्रत्येक शाळेतील मराठीच्या शिक्षकांना उत्तम शिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले पाहिजे, परिपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा असली पाहिजे, प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र संगणक लॅब असावी, चांगली क्रीडा सुविधा मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळांमधून शिबिरांचे आयोजन केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या. 

Web Title: Aurangabad Municipal School is better than Mumbai