इथे मुगाला मिळतोय सात हजार रुपयांचा दर.....

प्रकाश बनकर
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

परतीच्या अवकाळी पावसामूळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. यामूळे खरीपाचा बहुतांश पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत.शेतकऱ्यांचा विचार करून पुन्हा मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत वाढ देण्यात आली आहे. 

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मात्र, ग्राहकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. यात मुग खरेदीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंतच मुदत देण्यात आली होती. त्यात आत 29 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर उडीद व सोयाबीन खरेदीसाठी जानेवारी 2020 पर्यंत वाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा पणन अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. 

परतीच्या अवकाळी पावसामूळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. यामूळे खरीपाचा बहुतांश पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. यामूळे हमीदाराने मूग, उडीद व सायाबीनचे नुकसान झाले आहेत. ज्यांची पिके वाचली, त्यांना बाजारपेठेस आणण्यास उशीर लागत आहेत. यामूळे जिल्हा मार्केटींग फेडरेशनतर्फे जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या चार खरेदी केंद्रावर अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचा विचार करून पुन्हा मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत वाढ देण्यात आली आहे. 

इथे सुरु आहे खरेदी केंद्र 

जिल्हा मार्केटिग फेडरेशनतर्फे जिल्ह्यात चार ठिकाणी मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यात जाधववाडी येथील बाजार समितीत खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासह गंगापूर, वैजापूर आणि खुलताबाद येथे खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या खरेदी केंद्रावर आपला मूग, उडीद आणि सोयाबीन विक्रीसाठी आणावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी डी. आर. मातेरे यांनी केले. 

केवळ 14 शेतकऱ्यांची नोंदणी 
जिल्ह्यात हमी दराने खरेदी सुरु आहे. यात चारपैकी केवळ खुलताबाद येथील केंद्रावर 14 शेतकऱ्यांनी मुगाची हमी दराने खरेदी करण्यासाठी नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांकडून 111 क्‍विंटल 50 किलो मुगाची हमी दराने खरदी करण्यात आली आहे. हमीदाराने केवळ 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. 29 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

शेतमालाचा प्रकार हमीभाव प्रति क्‍विंटल खरेदीसाठी देण्यात आलेली मुदत 
मूग 7 हजार 50 रूपये 29 डिसेंबर2019 
उडीद 5 हजार 700रूपये 27 जानेवारी 2020 
सोयाबीन 3 हजार 710 रूपये 27 जानेवारी 2020 

हेही वाचा- आयुक्‍ताविना कशी चालते महापालिका? 
हेही वाचा- बायको छळते? इथे मिळेल आधार... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad ;Naphed Extend Moong, Udit, Soyabean Buying dedline