महिला वाहकांस छेडछाड करीत पळविले 28 हजार रूपये

शेखलाल शेख
बुधवार, 24 मे 2017

मध्यवर्ती बसस्थानकातील प्रकार; एक ताब्यात एक दलाल फरार

औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानकात दलालांची दादागिरी चांगलीच वाढली आहेत. गेल्या आठवड्यात सुरक्षा रक्षकांना धमकविण्याचा प्रकार ताजा असतानाच बुधवारी (ता.24) महिला वाहकांच्या छेडछाड करून दोन दलालांनी 28 हजार 700 रूपये पळविल्याची घटना घडली आहेत. या प्रकरणी एका दलालास महिला वाहक आणि इतरांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर दुसरा फरार झाला आहेत. आज (बुधवार) सकाळी ही घटना घडल्यामूळे बसस्थानकातील महिला कर्मचारी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहेत.

मध्यवर्ती बसस्थानकात चालू महिन्यात दोन ते तीन प्रवाशी पळविणाऱ्या दलांलवर कारवाई करण्यात आली. याचा राग मनात धरत दोन दलालांनी मंगळवारी (ता.23) मध्यवर्ती बसस्थानकात रात्रभर धुमाकूळ घातला. आज सकाळी साडे सहा वाजता वाहक महिलांची छेड काढत त्यांच्याकडे असलेल्या 28 हजार रूपये पळविले. यातील जाकेर नावाचा एका दलाला पकडूप क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी जाकेर आणि त्यांच्या अन्य साथीदारा विरोधात त्रकार दाखल केली आहेत. यापुर्वी दोन ते तीन वेळा या दलालांनी या महिला वाहकांची छेड काढली होती. मध्यवर्ती बसस्थानकात अनेक वर्षांपासून हे दलाल एसटीचे प्रवाशी पळवत आहे. या विरोधात एसटीतर्फे क्रांती चौक पोलिस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र, कुठलीच करावाई होत नसल्यामूळे असे प्रकार वाढले आहेत. बसस्थानकाच्या समोर 200 मीटरच्या आता 15 हून अधिक खाजगी ट्रॅव्हल्सचे दुकाने आहेत. हचे खाजगी ट्रॅव्हर्ल्स दलालांच्या माध्यामतून प्रवाशी पळवित कमाई करीत आहेत. यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहेत.

दरम्यान पडित महिला कर्मचारी आणि एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्‍तांची भेट घेत मध्यवर्ती बसस्थानकाची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहेत.

Web Title: aurangabad news: 28 thousand rupees by the brokerage of the women conductor