शहराचा पारा 38 पार, उष्म्यामुळे नागरिक हैराण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

औरंगाबाद - मागील दोन दिवसांपासून शहराचा पारा 38 च्या अंशांच्या पुढे गेला आहे. परिणामी, उष्म्यामुळे माणूसच काय तर पशुपक्षीही हैराण झाले आहेत. प्रचंड उष्म्यामुळे पक्ष्यांना प्यायला पाणीही मिळेनासे झाले आहे. त्यांच्यासाठी शहर आणि उपनगरांतील घरांच्या टेरेसवर, गॅलरीत, झाडांवर पाणी ठेवून पर्यावरणप्रेमी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. प्रामुख्याने यामध्ये मुलांचा आणि वयोवृद्धांचा वाटा मोठा आहे. केवळ काहींनीच पक्ष्यांना पाण्याची सोय करून उपयोग नाही, त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञांकडून केले जात आहे.

यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. मंगळवारी (ता. 27) तर शहरात 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वातावरणात सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला तरी दिवसभर उन्हाचा तडाखा प्रचंड असतो. शहरात दुपारी चारपर्यंत रस्त्यांवरही गर्दी कमी होऊ लागते. वाहनधारक उन्हापासून सुटका व्हावी म्हणून रुमाल, स्कार्फचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: aurangabad news 38 temperature