खरिपासाठी केवळ 5.5 टक्के पीककर्ज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

औरंगाबाद - खरीप हंगामासाठी औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती बॅंक, व्यापारी बॅंक आणि ग्रामीण बॅंक यांना 4 हजार 832 कोटी 53 लाख 60 हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र 2 जूनपर्यंत केवळ 5.45 टक्‍के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. 

येत्या वर्षात खरीप व रब्बीसाठी पतपुरवठा करताना जिल्हा सहकारी बॅंकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कर्जवाटपाचा अधिकचा बोजा टाकला; परंतु प्रत्यक्षात कर्जवाटपात या तीनही बॅंका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असल्याचे चित्र चार जिल्ह्यांत आहे. या चार जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी 2 जूनपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ 8.54 टक्‍केच पूर्ण केले. दुसरीकडे ग्रामीण बॅंकेने 14.61 टक्‍के कर्जपुरवठा केला; तर व्यापारी बॅंकने केवळ 3.03 टक्‍के उद्दिष्टपूर्ती केली. 

Web Title: aurangabad news 5.5 per cent crop loans