अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ठिकाणांच्या मुक्‍तीसाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - शहर व जिल्ह्यातील रस्त्यांवरील अपघाताला निमंत्रण देणाऱ्या स्थळांची (ब्लॅक स्पॉट) यादी तयार करण्यात आली आहे. तब्बल ५६ ठिकाणांची अपघातातून मुक्तता करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

औरंगाबाद - शहर व जिल्ह्यातील रस्त्यांवरील अपघाताला निमंत्रण देणाऱ्या स्थळांची (ब्लॅक स्पॉट) यादी तयार करण्यात आली आहे. तब्बल ५६ ठिकाणांची अपघातातून मुक्तता करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

देशभरातील रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक बनत आहेत. रस्ते अपघातामुळे रोज शेकडो व्यक्ती मृत्युमुखी पडत असून, हजारो जण जखमी होतात, अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. रस्त्यावरील धोकादायक अपघात अनेक कुटुंबांना उद्‌ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहे. म्हणूनच वाढच्या अपघाताच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार परिवहन विभागाने अपघातग्रस्त भागांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यांच्या पाचशे मीटर लांबीच्या परिसरात गेल्या तीन वर्षांत पाच रस्ते अपघात झाले आहेत किंवा जेथे मागील तीन वर्षांत रस्ते अपघातात दहा व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत, अशी अपघाताला निमंत्रण देणारी स्थळे वा ठिकाणे शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहर व परिसररातील २२ ठिकाणांसह औरंगाबाद ग्रामीणमध्ये ३४ ठिकाणे शोधण्यात आली आहेत. या अपघातग्रस्त जागांची परिस्थिती बदलून अपघात होणार नाही, अशी उपाययोजना करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून जिल्हा रस्ते  सुरक्षा समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या समितीच्या मंजुरीने हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अशा सुचविल्या उपाययोजना 
तीव्र वळण सरळ करणे, धोकादायक वळण असल्याच्या पाट्या लावणे, वळणाची तीव्रता कमी करणे, दिशादर्शक फलक लावणे, वेग नियंत्रक फलक लावणे, गतिरोधक उभारणे, कॅट आय (चमकणारे ब्लॉकचे चिन्ह) बसविणे यासह रम्बलर बसविणे यासह अपघातग्रस्त स्थळांना मुक्त करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

काही अपघातग्रस्त ठिकाणे 
 बीड बायपास रस्त्यावर एमआयटी चौक, मास्टर कुक हॉटेल आणि रेणुकामाता कमान 
 एएस क्‍लब, बजाजगेट, रांजणगाव चौक, बजाजनगर, साजापूर फाटा, कामगार चौक, तीसगाव चौफुली, मायलॉन कंपनीसमोर, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, कोलगेट चौक, खोजेवाडी फाटा, एनआरबी चौक, रिलायन्स पेट्रोलपंपासमोर.  

Web Title: aurangabad news accident