औरंगाबाद : ट्रक-टेम्पो अपघात 1 व्यक्ती आणि 40 शेळ्या ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

एकजण जागीच मृत्युमुखी पडला, तर  40 शेळ्याही यात मृत्युमुखी पडल्या. 

गल्लेबोरगाव : खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे कन्नड - औरंगाबाद महामार्गावर बुधवारी  (ता. 21) मध्यप्रदेशहून सोलापूरकडे शेळ्या घेऊन जाणारा टेम्पो व औरंगाबादहून गुजरातकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये एकजण जागीच मृत्युमुखी पडला, तर  40 शेळ्याही यात मृत्युमुखी पडल्या. 

नारायण असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो मूळचा मध्यप्रदेशातील राहणारा आहे. नारायण हा जागीच ठार झाला, टेम्पो क्रमांक एमएम 13 आर 4215 आणि ट्रक क्रमांक जीजे 03 बीवी 7280 यांच्यात हा अपघात झाला.

सलमान, अनिल चव्हाण, नूर मोहम्मद रहीम  (रा. मध्यप्रदेश)  गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच, या अपघातात आणखी 20 शेळयासुद्धा जखमी झाल्या आहेत.

सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण यांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हलवून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू करत पळसवाडी येथील ग्रामस्थांनी जेसीबीच्या साह्याने महामार्गावर पडलेल्या मृत शेळया दूर करण्यासाठी मदत केली.

Web Title: aurangabad news accident one dead, 40 goats dead

फोटो गॅलरी