महापालिका प्रशासनाचा मिटमिट्यात निषेध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

औरंगाबाद - मिटमिटा येथे कचरा टाकू नका म्हणून गावकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार सांगूनही गुरुवारी (ता. एक) सकाळी कचऱ्यांची वाहने आणण्यात आली. ही वाहने अडवून नागरिकांनी प्रशानास विरोध दर्शविला. कचऱ्यासाठी दुसऱ्या जागेचा शोध घेण्याची मागणी करीत नागरिकांनी भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन केले. 

यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येत कचऱ्याच्या गाड्या घेऊन येणाऱ्या विरोधात घोषणाबाजी केली. यामेळी ग्रामस्थ दीपक ढाकणे, बबनराव मुळे, संपत जाधव, रामा सिरसाट, बाबा मुळे, रंगनाथ साबळे, रफीक पठाण, विकास तुपे, राजू अप्पा गुजरे, साहेबराव चेताडे, लक्ष्मण बनकर, अण्णासाहेब वाकळे व यांच्यासह मिटमिटा येथील शेकडो ग्रामस्थ मंडळी रस्त्यावर उतरली होती.

नारेगावच्या नागरिकांच्या प्रश्नाशी आम्ही सहमत आहोत. कचरा त्यांच्याही भागात नको आणि आमच्याही भागात नको; परंतु कचऱ्यावर दहा पंधरा वर्षांपूर्वीच प्रक्रिया केली पाहिजे होती. मात्र, महापालिका प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा हा गलथान कारभार दिसून येत आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी नसल्यामुळेच हा प्रश्‍न उभा राहिला आहे. नारेगावात तीव्र विरोध होतोय म्हणून कचरा मिटमिटा, हर्सूल, कांचनवाडी भागात टाकण्याचा हा प्रशासनाचा कट आहे. तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
- बाळासाहेब गायकवाड, शहर उपाध्यक्ष भाजप

Web Title: aurangabad news AMC garbage