महापौरपदासाठी तिघांचे, तर उपमहापौरसाठी चौघांचे अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महापौर, उपमहापौरपदासाठी २९ ऑक्‍टोबरला निवडणूक होणार असून, बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी तिघांनी पाच अर्ज, तर उपमहापौरपदासाठी चार जणांनी आठ अर्ज दाखल केले. शिवसेना-भाजप युतीतर्फे नंदकुमार घोडेले, एमआयएम पक्षातर्फे अब्दुल नाईकवाडी; तर काँग्रेसतर्फे अयूब खान यांनी महापौरपदासाठी; तसेच उपमहापौरपदासाठी युतीतर्फे विजय औताडे, एमआयएम पक्षातर्फे संगीता वाघुले, काँग्रेसकडून अफसर खान व रिपाइंचे कैलास गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. 

महापौर, उपमहापौरपदासाठी रविवारी (ता.२९) निवडणूक होणार आहे. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे बहुमत असून, पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद हे शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे राहणार आहे. त्यानुसार शिवसेनेने अनुभवी नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी जाहीर केली आहे; तर भाजपने बुधवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विजय औताडे यांचे नाव अंतिम केले. त्यानुसार दोघांनी सकाळी ११.३० वाजता अर्ज दाखल केला. या वेळी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, भाजपचे शहरप्रमुख किशनचंद तनवाणी, विद्यमान महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते गजानन मनगटे, माजी महापौर विकास जैन, अनिता घोडेले, कला ओझा यांच्यासह राजू वैद्य, बसवराज मंगरुळे, विजय वाघचौरे, प्रशांत देसरडा, मकरंद कुलकर्णी, अनिल मकरिये, किशोर नागरे, पूनम बमणे, सचिन खैरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यानंतर एमआयएम पक्षातर्फे अब्दुल नाईकवाडी यांनी महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी संगीता वाघुले, काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी अयुब खान यांनी, तर उपमहापौरपदासाठी अफसर खान यांनी, तसेच उपमहापौरपदासाठी रिपाइंचे कैलास गायकवाड यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: aurangabad news amc Mayor election