भाजप बनला खरेदी-विक्री संघ - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - येईल त्याला पैसे देऊन भाजप फोडाफोडी करीत आहे. त्यामुळे भाजप देशातील खरेदी-विक्री संघ झाला असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. आपण संघटित राहून तुमची फोडाफोडी बंद करा, असे सांगण्याची आणि देशात व महाराष्ट्र पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभात रविवारी (ता. 13) श्री. चव्हाण अध्यक्षीय भाषणात बोलत होते. 

ते म्हणाले, की प्रत्येक राज्यात फोडाफोडीचे धंदे सुरू आहेत. गुजरातमध्ये अहमद पटेल यांनी भाजपला चोख उत्तर दिले. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही ठरविले जात आहे. इंग्रजांविरोधातील लढ्यापेक्षाही तीव्र लढा संयुक्‍तपणे उभारण्याची गरज आज आहे. यासाठी आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्यात आणि देशात क्रांती घडविण्यासाठी मराठवाडा अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

Web Title: aurangabad news ashok chavan bjp congress