‘ऑरिक’मध्ये सर्वसामान्यांसाठी  १५ एकरांत वसाहत

आदित्य वाघमारे
रविवार, 18 मार्च 2018

औरंगाबाद - औद्योगिक वसाहत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये (ऑरिक) आता नागरी वसाहत वसविली जाणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारी अशी १५ एकरांतील नागरी वसाहत उभारण्यासाठी पावले टाकायला प्रशासनाने सुरवात केली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्याच्या पाच वर्षांत ही सुविधांनी युक्त वसाहत उभी करण्यात येणार असल्याचे ऑरिक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत सुरू असलेल्या ऑरिकमध्ये औद्योगिक भूखंडांवर कंपन्यांच्या उभारणीसह आता रहिवासी वसाहतीही उभारल्या जाणार आहेत. १५ एकर जागेवर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील घरे उभारणीसाठी बांधकाम व्यावसायिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सर्वसामान्यांसाठी साडेसहाशे चौरस फूट (६० चौरस मीटर) मापाच्या घरांची वसाहत उभी केली जाणार आहे. ही वसाहत सर्व सुविधांसह करार करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने तयार करण्याचे यात बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी इच्छुकांना आपल्या प्रकल्पाचा अहवाल सादर करावा लागणार असून, त्याच्या उभारणीसाठीची किंमत, घरांची संख्या, सुविधांची माहितीही त्यात नमूद करावी लागणार आहे. ३,२०० रुपये प्रतिचौरस मीटर मोकळ्या जागेची किमान किंमत राहणार असून, पंतप्रधान आवास योजनेचा लाभही या प्रकल्पात दिला जाणार असल्याचे ‘ऑरिक’तर्फे काढण्यात आलेल्या प्रस्तावात नमूद आहे. 

Web Title: aurangabad news Aurangabad Industrial City marathwada midc