औरंगाबाद: बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

दरम्यान कर्जमाफीच्या घोषणेला तीन महीने पूर्ण होत नाही. तोच शासनाच्या कोलांटउडीचे शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी नोटिस देण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. यामुळे थकबाकीदार शेतकरी भयभीत झाले आहे.

जरंडी (जि. औरंगाबाद) : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्यात 30 जून अखेरीस थकबाकीदार असलेल्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिस लावल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान कर्जमाफीच्या घोषणेला तीन महीने पूर्ण होत नाही. तोच शासनाच्या कोलांटउडीचे शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी नोटिस देण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. यामुळे थकबाकीदार शेतकरी भयभीत झाले आहे.

आज (रविवारी) सुटीच्या दिवशीही तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज सुरू असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांसह चालू थकबाकीदारांनाही कर्ज भरण्याच्या नोटिस देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मिळणारी तातडीची कर्जरूपी दहा व पंचवीस हजार रुपयांची मदत हवेत विरल्याची चर्चा सोयगाव तालुक्यात सुरू आहे. या प्रकरणी सहायक निबंधक भावुसाहेब मरमट यांच्याशी संपर्क साधला असता. या प्रकाराची सोमवारी माहिती घेण्यात येऊन नोटीस बजावणाऱ्या बँकांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले.

Web Title: Aurangabad news bank send notice farmers