देणग्यांचा हिशोब महंतांनी द्यावाः प्राचार्य मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

प्राचार्य खुशाल मुंडे : दसरा मेळाव्यात खुलासा करण्याची मागणी

औरंगाबाद: भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांना भगवानबाबांच्या उद्देशांसाठी लोक लाखोंच्या देणग्या देतात. मात्र, याबाबत कोणताही ताळेबंद ठेवला जात नाही की, पावत्या दिल्या जात नाहीत. याबाबत महंतांनी दसऱ्यापूर्वी खुलासा करावा, असे आवाहन वंजारी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा दसरा मेळावा कृती समितीचे निमंत्रक प्राचार्य डॉ. खुशाल मुंडे यांनी केले.

दसरा मेळावा कृती समितीतर्फे आज (शनिवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. यात डॉ. मुंडे म्हणाले, "समाजाच्या ऊसतोड कामगारांची मुले शिकली पाहिजेत, त्यांच्या शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये उभारली जावीत, या भगवानबाबांच्या उद्देशासाठी समाजातील लोक तत्पर असतात, महंत जेव्हा एखाद्या गावात जातात तेव्हा, एकेका गावातून दोन ते अडीच लाख रुपये देणगी स्वरुपात जमा होतात, याबाबत कोणत्याही पावत्या दिल्या जात नाहीत, त्या पैश्‍यांचे होते काय? याचा हिशोब महंतांनी दसऱ्याला द्यावा. तसेच महंत जर स्वत:ला संन्यासी मानत असतील तर ते त्यागी असायला हवेत, महागड्या आलिशान गाड्यातून त्यांना कसे फिरावेसे वाटते.'' अशी टीकाही समितीतर्फे करण्यात आली.

गडाच्या संपत्तीवर मुंडे कुटूंबियांचा डोळा नाही. तसे असते तर, गोपिनाथगड कशाला उभारला असता. वाद जमिनीचा होता तर, महंतांना दोन वर्षे स्मृतिभ्रंश झाला होता का? महंतांच्या बोलण्यातून पंकजा मुंडे यांना विरोध एवढ्यापुरताच सिमित वाटतो. यामुळे महंतांचा खोटारडेपणा उघड होत असल्याचा दावा समितीच्या सदस्यांनी केला. पत्रपरिषदेत प्रदेशाध्याक्ष अनिल फड, अभिषेक बडे, सविता घुले, मनिषा मुंडे, रविंद्र जायभाये, इंदुमती आघाव, ज्ञानेश्‍वर वाघ यांच्यासह इतर जिल्ह्यातील सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

Web Title: aurangabad news bhagwangad Donation and Principal khushal Munde