पत्रकार भालचंद्र देशपांडे यांचे औरंगाबादेत निधन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

औरंगाबाद - येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भालचंद्र यशवंतराव देशपांडे (वय 67) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर दुपारी तीन वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

देशपांडे यांनी मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. सध्या ते "सांजवार्ता'चे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. "मराठवाडा'सह अन्य वृत्तपत्रांत त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. त्यांनी कथा, कादंबरीही लिहिल्या आहेत. माय अर्कायचे रोहन देशपांडे, केतन देशपांडे यांचे ते वडील होत.

Web Title: aurangabad news bhalchandra deshpande